तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 09:27 AM2020-08-21T09:27:04+5:302020-08-21T09:35:12+5:30

तेलंगणाच्या श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये (Srisailam hydroelectric plant) आग लागली आहे.

telangana fire at srisailam hydroelectric plant many trapped ndrf called | तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती

तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती

Next

नवी दिल्ली - तेलंगणातील एका हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 9 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये (Srisailam hydroelectric plant) आग लागली आहे. या आगीमुळे पॉवर प्लांटच्या युनिट स्फोट झाले. गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. 

आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफची देखील मदत घेण्यात आली आहे. कुरनूलच्या आत्मकूर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. भीषण आगीतून आतापर्यंत दहा जणांची सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे. तर नऊ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

गुरुवारी रात्री श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये अचानक भीषण आग लागली. यावेळी काही कर्मचारी देखील तेथे उपस्थित होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. तेलंगणाचे ऊर्जामंत्री जगदीश्वर रेड्डी हे बचाव कार्यात लक्ष ठेवून आहेत. यामधून दहा जणांची सुटका करण्यात यश आले आहे. भीषण आगीमुळे स्फोट देखील झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

"येत्या 6-7 महिन्यांत देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

"4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात"

धक्कादायक! पंतप्रधान मोदींना 18 पानांचं पत्र लिहून मुलीची आत्महत्या

VIDEO: ...अन् बिहारच्या डीजीपींनी थेट रिया चक्रवर्तीची 'औकात' काढली; ऐका काय म्हणाले

बापरे! आग्र्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक, परिसरात खळबळ

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा दिसताहेत लक्षणं, वेळीच व्हा सावध

Web Title: telangana fire at srisailam hydroelectric plant many trapped ndrf called

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.