आमदार विकले १०० कोटींत?; ४ राज्यांत छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 08:29 AM2022-11-14T08:29:54+5:302022-11-14T08:30:29+5:30
Telangana: तेलंगणच्या चार आमदारांना १०० कोटींना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज्य पोलिसांनी ४ राज्यांमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा येथे छापे टाकले.
हैद्राबाद : तेलंगणच्या चार आमदारांना १०० कोटींना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज्य पोलिसांनी ४ राज्यांमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा येथे छापे टाकले.
याप्रकरणी एसआयटीने तीन आरोपींना अटक केली आहे. हरियाणातील फरिदाबादचे धर्मगुरू रामचंद्र भारती, हैद्राबादचे व्यापारी नंदकुमार आणि तिरुपतीचे सिम्हाजी स्वामी यांचा यामध्ये यमावेश आहे. कोची येथील डॉ. जग्गू यांच्या घराचीही झडती घेण्यात आली.
एसआयटी अधिकाऱ्याने सांगितले की, एका आमदाराचे नातेवाईक असलेल्या श्रीनिवासने सिंहाजी स्वामी यांच्यासाठी तिरुपतीहून हैदराबादला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते, असा दावा त्यांनी केला.
सरकारे का पाडली जात आहेत?
या लोकांना तेलंगणा ताब्यात घ्यायचा आहे. मी सांगू इच्छितो की आपण काळजीपूर्वक मतदान करावे. मला भाजपच्या लोकांना विचारायचे आहे की ही क्रूरता का? अजून किती ताकद हवी आहे? तुम्ही दोनदा निवडून आलात, मग सरकार का पाडताय?, असे केसीआर यांनी म्हटले होते.