तेलंगणातून एनटीआर यांची नात सुहासिनी निवडणुकीच्या रिंगणात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 05:30 AM2018-11-18T05:30:33+5:302018-11-18T05:30:57+5:30

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. एन. टी. रामाराव यांची नात नंदामुरी सुहासिनी यांना कुकटपल्लीमधून लढण्यासाठी गळ घालण्यात आली आहे.

 Telangana NTR's granddaughter in the election of Suhasini! | तेलंगणातून एनटीआर यांची नात सुहासिनी निवडणुकीच्या रिंगणात!

तेलंगणातून एनटीआर यांची नात सुहासिनी निवडणुकीच्या रिंगणात!

Next

- धनाजी कांबळे

हैैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. एन. टी. रामाराव यांची नात नंदामुरी सुहासिनी यांना कुकटपल्लीमधून लढण्यासाठी गळ घालण्यात आली आहे. त्यासाठी तेलगु देसम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीच पुढाकार घेतला आहे.
माजी खासदार व टीडीपीचे कार्यकारिणी सदस्य नंदामुरी हरीकृष्णा यांच्या सुहासिनी कन्या आहेत. हरीकृष्णा यांचा आॅगस्टमध्ये अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांची कन्या तेथून सहज विजयी होईल, असा विश्वास टीडीपी नेत्यांना आहे. काँग्रेस आघाडीमध्ये टीडीपीला १४ जागा मिळाल्या आहेत. त्यातच सुहासिनी यांना सामावून घेण्यात आले आहे.
सुहासिनी यांनी अर्ज भरावा यासाठी एन. चंद्राबाबू नायडू यांनीच आग्रह केला होता. सुहासिनी यांनी होकार कळवला आहे. टीडीपीचे खासदार चंद्रू श्रीहरी यांचे पुत्र
श्रीनाथ हे सुहासिनी यांचे पती आहेत. तेलगू चित्रपटांतील नंदामुरी कल्याण राम व एनटी रामाराव ज्युनिअर हे सुहासिनी यांचे भाऊ आहेत. कुकटपल्ली मतदारसंघात खम्मा समाजाची लोकसंख्या सर्वाधिक असून, आंध्र व रायलसीमाला जोडून हा मतदारसंघ आहे.

टीआरएसला मतदान न करण्याची शपथ
सिद्दीपेठ जिल्ह्यातील तोगुटा गटातील सुमारे ४००० शेतकऱ्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला (टीआरएस) मतदान न करण्याची शपथ घेतली आहे. गोदावरी नदीवर प्रस्तावित असलेल्या कलमेश्वर प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन करण्यास शेतकºयांचा विरोध आहे. सरकार मात्र या प्रकल्पासाठी आग्रही आहे.
जोपर्यंत आमच्या मागण्यांचा
विचार केला जात नाही, तोपर्यंत जमिनीचे संपादन करू नये, अशी शेतकºयांची भूमिका आहे. तब्बल ९८०० कोटींचा हा प्रकल्प असून, त्यासाठी १२ लाख एकर जमीन संपादित केली जाणार आहे. सिद्दीपेठ, मेडक आणि रंगारेड्डी जिल्ह्यांतील शेतकरी यामुळे बाधित होणार आहेत.

Web Title:  Telangana NTR's granddaughter in the election of Suhasini!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.