Telangana BJP: भाजपचे मिशन तेलंगणा! केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते दोन दिवस सर्व मतदारसंघांचा दौरा करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:44 PM2022-06-28T12:44:48+5:302022-06-28T12:45:47+5:30

Telangana BJP: केंद्रीय मंत्री (पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री वगळता सर्व) आणि वरिष्ठ नेत्यांना 30 जूनच्या सकाळपर्यंत आपापल्या मतदारसंघात पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.

telangana union ministers spend two days in 119 constituencies bjp national executive meeting in hyderabad | Telangana BJP: भाजपचे मिशन तेलंगणा! केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते दोन दिवस सर्व मतदारसंघांचा दौरा करणार!

Telangana BJP: भाजपचे मिशन तेलंगणा! केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते दोन दिवस सर्व मतदारसंघांचा दौरा करणार!

Next

नवी दिल्ली : दक्षिणेचे गेट म्हटल्या जाणाऱ्या तेलंगणात पुढील वर्षी निवडणुका (Telangana Election) होणार आहेत. यासाठी राजकीय पक्षांकडून तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि भाजपही निवडणुकीच्या रंगात रंगले आहेत. मात्र, यावेळी सर्वांच्या नजरा भाजपकडे लागल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी राज्यातील 119 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. मे महिन्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचा दौरा करून पक्षाच्या संघटनेत उत्साह भरला आहे. आता हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे आयोजन करून पक्षाने आपला इरादा स्पष्ट केला आहे.

तेलंगणा भाजपचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. लक्ष्मण म्हणाले की, महाराष्ट्रात डायनेस्टिक पॉलिटिक्सविरोधात आवाज उठवला गेला आहे. तेलंगणा हा त्याचाच पुढचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप विकास आणि घराणेशाही नष्ट करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवेल आणि तेलंगणात सरकार स्थापन करेल. तर भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे (एनईसी) सदस्य 30 जूनपासून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन दिवसांचा दौरा करणार आहेत.

केंद्रीय मंत्री (पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री वगळता सर्व) आणि वरिष्ठ नेत्यांना 30 जूनच्या सकाळपर्यंत आपापल्या मतदारसंघात पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. हैदराबादमध्ये 2 जून रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होण्यापूर्वी सर्वजण दोन दिवस किंवा 48 तास वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात घालवतील. राष्ट्रीय कार्यकारिणीचे हे सदस्य सर्व राजकारणाशी संबंधित माहिती गोळा करतील, ज्याच्या आधारे पक्ष राज्यात आपली रणनीती तयार करेल.

हैदराबादमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार!
हैदराबाद येथे होणाऱ्या दोन दिवसीय भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे प्रमुख जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक संपल्यानंतर मोदी हैदराबादच्या परेड ग्राऊंडवर जाहीर सभेला संबोधित करतील.

भाजपचे मिशन तेलंगणा! 
एकूणच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या (National Executive Meeting) बैठकीतून निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र राव यांनी सांगितले की, शेवटच्या दिवशी म्हणजेच 3 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेसाठी राज्यभरातून दहा लाख लोकांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान, तेलंगणामध्ये डिसेंबर 2023 मध्ये (Telangana Election 2023) विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, टीआरएस प्रमुख आणि मुख्यमंत्री केसीआर गेल्यावेळेप्रमाणे पहिली निवडणूक घेऊ शकतात, असा विरोधकांचा विश्वास आहे. मुख्यमंत्री केसीआर यांनी यावेळी पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या आयपीएसीकडे सोपवली आहे.

Web Title: telangana union ministers spend two days in 119 constituencies bjp national executive meeting in hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.