दूरसंचार कंपन्यांच्या योजना आता ‘ट्राय’च्या वेबसाइटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:55 AM2017-08-14T00:55:34+5:302017-08-14T00:56:17+5:30
एकाला एक दर आणि दुसºयाला दुसरा... अशा बार्गेन करण्याच्या युगात टेलिकॉम कंपन्यांचेही अनेक दर समोर आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एकाला एक दर आणि दुसºयाला दुसरा... अशा बार्गेन करण्याच्या युगात टेलिकॉम कंपन्यांचेही अनेक दर समोर आले आहेत. आपल्याला आपली दूरसंचार कंपनी अधिक दर तर लावत नाही ना, अशी शंका अनेकांना नेहमी येत असते. हीच समस्या आता दूरसंचार नियामक प्राधिकरण दूर करणार आहे. दूरसंचार ग्राहकांना आता विविध कंपन्यांच्या योजना दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय)वेबसाइटवर पाहता येणार आहेत. ट्रायचे
अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी ही माहिती दिली.
विमा, एअरलाइन्सचे दर ज्याप्रमाणे आॅनलाईन पाहिले जातात, त्याचप्रमाणे दूरसंचारचे विविध योजनांचे दर या वेबसाइट वा अॅपच्या माध्यमातून पाहता येतील. ट्रायने अलीकडेच सर्व दूरसंचार कंपन्यांना स्पष्ट केले आहे की, त्यांनी आपल्या योजनांचे दर इलेक्ट्रॉनिक स्वरूपातही जाहीर करावेत. दूरसंचार कंपन्यांकडून दरवर्षी साधारणपणे २४ हजार दर दाखल केले जातात. यात विविध सर्कलमधील आॅपरेटर्सच्या शुल्क योजना आणि विशेष शुल्क योजना यांचाही समावेश आहे.
शर्मा यांनी सांगितले की, आम्ही फक्त पारदर्शी शुल्क वेबसाइटवर दाखविणार नाही, तर यात मशिन रिडेबल डेटा असेल. त्या माध्यमातून नागरिकांना आपल्या आवडीनुसार अर्ज करता येईल आणि जे हवे ते निवडता येईल. यासोबत एपीआय कोड पुरविण्यात येईल. ट्रायच्या साइटवर प्रदर्शित करण्यात आलेल्या दरावर आधारित उत्पादन बनविण्याची परवानगी अॅप निर्मात्यांना देण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, विमा क्षेत्रातील अॅपच्या माध्यमातून अशी विचारणा होते की, कोणती पॉलिसी सर्वोत्कृष्ट आहे? अन्य योजनांशी याची तुलना केली जाऊ शकते. ज्या माध्यमातून ग्राहकांना आवडीनुसार पर्याय निवडता येईल.
शर्मा यांनी सांगितले की, याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे. दूरसंचार कंपन्यांनानाही आम्ही सांगितले आहे की, आॅनलाइन डेटा जमा करावा. जेणेकरून त्यांच्या कामाचा ताण कमी होईल.
दरम्यान, आपली नेटवर्क कंंपनी बदलू इच्छिणाºया ग्राहकांना काही आॅपरेटर्सनी विशेष आॅफर देऊ केल्याचा आरोप रिलायन्स जिओने या वर्षीच्या सुरुवातीला केला होता. जिओने आरोप केला होता की, अशा आॅफर गुप्तपणे ग्राहकांना देऊ
केल्या जातात. त्या आॅफर प्रत्यक्षात कंपनीच्या वेबसाइटवर दिसून
येत नाहीत.
>ग्राहकांचे हित
विविध कंपन्यांच्या योजना ट्रायच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार असल्यामुळे, यात ग्राहकांचा फायदा होणार आहे. पारदर्शकतेसोबतच ग्राहकांना आपली योजना निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.