मोफत विमा, लॅपटॉप, गॅस सिलेंडर अन्..; तेलंगणासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 11:22 PM2023-11-18T23:22:12+5:302023-11-18T23:22:53+5:30
Telengana BJP Menifesto: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तेलंगणा विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
Telengana BJP Menifesto Released: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (18 नोव्हेंबर) तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. अमित शाह म्हणाले की, "मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर 2 लाख रुपये, पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्यांना मोफत लॅपटॉप. हा जाहीरनामा पंतप्रधान मोदींची हमी आहे," असं शहा यावेळी म्हणाले.
निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणली जाईल
जाहीरनाम्यानुसार महिला बचत गटांना केवळ 1 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मोफत विमा देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला 4 मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. तेलंगणात भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केल्यावर ते 6 महिन्यांत राज्यात समान नागरी संहिता (UCC) आणेल, असेही या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
Under the Pradhan Mantri Fasal Bima Yojana, the farmers will be given free insurances under the BJP Government.
— BJP (@BJP4India) November 18, 2023
The beneficiaries of the Ujjwala Yojana will be given 4 gas cylinders per year, free of cost.
- Shri @AmitShah#BJP4SaubhagyaTelanganapic.twitter.com/coC8oPcyn6
काँग्रेसवर निशाणा
जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शहांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले. 2004 ते 2014 काळात काँग्रेस पक्षाने 'संयुक्त आंध्र प्रदेश'साठी केवळ 2 लाख कोटी रुपये अनुदान म्हणून जारी केले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने अवघ्या 9 वर्षात 2 लाख 50 हजार कोटी रुपये जारी केले. हा जाहीरनामा म्हणजे पंतप्रधान मोदींची हमी आहे. आम्ही दिलेली आश्वासने आम्ही नेहमीच पूर्ण केली आहेत. काँग्रेसने कधीच पाठिंबा दिला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.