'नागालँडचे लोक माणूस मारुन खातात...' भाजप नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 05:31 PM2022-07-13T17:31:21+5:302022-07-13T17:32:07+5:30

नागालँडचे मंत्री टेमजेन इमना अलाँग सध्या चर्चेत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Temjen Imna Along | 'People of Nagaland kill and eat people ...' BJP leader Temjen Imna Along's video goes viral | 'नागालँडचे लोक माणूस मारुन खातात...' भाजप नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

'नागालँडचे लोक माणूस मारुन खातात...' भाजप नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

Next

नवी दिल्ली: नागालँड सरकारमधील उच्च शिक्षण तथा आदिवासी व्यवहार मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री तेमजेन इमना अलाँग  (Temjen Imna Along) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ते 1999 मध्ये दिल्लीला आल्याचा एक मजेशीर आणि तेवढाच विचार करायला लावणारा एक किस्सा सांगत आहेत. नागालँडमधील विविध खाद्यपदार्थ, जुन्या दिल्ली स्टेशनवर येण्याचा अनुभव आणि इतर अनेक गोष्टींवर ते या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

भाजप नेते टेमजेन इमना अलाँग या व्हिडिओमध्ये सांगतात की, भारतातील लोकांमध्ये नागालँडबद्दल अनेक गैरसमज आहेत. उदाहरणार्थ, नागालँडचे लोक माणूस मारुन खातात. तेमजेन इमना अलाँग यांनी 13 जुलै रोजी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये टेमजेन सांगतात की, 'मी जेव्हा 1999 मध्ये पहिल्यांदा दिल्लीला आलो, जेव्हा आम्ही जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर उतरलो होतो. तेव्हा आम्हाला आमच्या नागालँड राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या इथे दिसली.'

'इतकी लोकं पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो. तेव्हा लोक म्हणायचे नागालँड कुठे आहे? तिथे जाण्यासाठी व्हिसाची गरज आहे का? नागा लोक माणसाला खातात का? नागालँडबद्दल चुकीची माहिती पसरवली जायची. आम्ही दिसायला वेगळे आहोत, आमचे खाण्याचे पदार्थ वेगळे आहेत, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. 50 वर्षांपासून त्याच पद्धतीने राहत आलो आहोत.' त्यांचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी रिट्विट केला आहे. तसेच, अनेकांना त्यांचा हा व्हिडिओ आणि प्रामाणिकपणा आवडत आहे.

ताजमहालात पोहोचल्यावर परदेशी समजले
टेमजेनचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्यांनी त्यांच्या आग्रा सहलीबद्दलचा अनुभव शेअर केला होता. 'आजतक'ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की, 1999 मध्ये आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी ते काउंटरवर पोहोचला तेव्हा लोकांनी त्यांना परदेशी समजले आणि तिकीटाचे 20 डॉलर्स मागितले. यानंतर त्यांना सांगावे लागले की, ते भारतीय असून नागालँडचे रहिवासी आहेत. 

लहान डोळ्यांचे अनेक फायदे 
टेमगेन यांच्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी लहान डोळ्यांचे फायदे सांगितले. 'डोळे लहान असल्यामुळे डोळ्यात घाण कमी जाते. स्टेजवर कार्यक्रम सुरू असताना झोपही घेता येते,' असे म्हणताच कार्यक्रमातील अनेकजण हसू लागतात.

Web Title: Temjen Imna Along | 'People of Nagaland kill and eat people ...' BJP leader Temjen Imna Along's video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.