तापमान ४४ अंश सेल्सीअस
By Admin | Published: May 14, 2016 12:02 AM2016-05-14T00:02:47+5:302016-05-14T00:02:47+5:30
जळगाव : तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून, ते ४४ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे. गुरुवारी व शुक्रवारी असे सलग दोन दिवस कमाल तापमान ४४ अंश सेल्सीअस एवढे होते. त्यासंदर्भातील नोंद ममुराबाद येथील हवामानशास्त्र विभागामध्ये झाली आहे. एप्रिल महिन्यात दुसर्या पंधरवड्यामध्ये कमाल तापमान ४४ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर तापमानात घसरण होत ते ३८ अंश सेल्सीअसपर्यंत खाली आले होते. मध्यंतरी वळवात आलेल्या हलक्या सरी व ढगाळ वातावरणामुळे तापमान स्थिर होते. पण मागील दोन दिवसात पुन्हा तापमान वाढले आहे. शुक्रवारी तर दुपारी रस्त्यावरून पायी किंवा दुचाकीवरून जाताना अक्षरश: चटके बसत होते. अंगाची लाहीलाही होत होती. रात्री नऊ वाजेपर्यंत उष्ण वारे वाहत होते.
ज गाव : तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून, ते ४४ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे. गुरुवारी व शुक्रवारी असे सलग दोन दिवस कमाल तापमान ४४ अंश सेल्सीअस एवढे होते. त्यासंदर्भातील नोंद ममुराबाद येथील हवामानशास्त्र विभागामध्ये झाली आहे. एप्रिल महिन्यात दुसर्या पंधरवड्यामध्ये कमाल तापमान ४४ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर तापमानात घसरण होत ते ३८ अंश सेल्सीअसपर्यंत खाली आले होते. मध्यंतरी वळवात आलेल्या हलक्या सरी व ढगाळ वातावरणामुळे तापमान स्थिर होते. पण मागील दोन दिवसात पुन्हा तापमान वाढले आहे. शुक्रवारी तर दुपारी रस्त्यावरून पायी किंवा दुचाकीवरून जाताना अक्षरश: चटके बसत होते. अंगाची लाहीलाही होत होती. रात्री नऊ वाजेपर्यंत उष्ण वारे वाहत होते.