तापमान चाळीशीच्या उंबरठ्यावर
By Admin | Published: March 13, 2016 12:03 AM2016-03-13T00:03:31+5:302016-03-13T00:03:31+5:30
जळगाव- तापमान दिवसागणिक वाढत आहे. यामुळे अंगाची लाहिलाही होत असून, शीतपेयांची मागणी वाढली आहे. दोनच दिवसात कमाल तापमान चार अंश सेल्सीअसने वाढून ३९.२ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे.
ज गाव- तापमान दिवसागणिक वाढत आहे. यामुळे अंगाची लाहिलाही होत असून, शीतपेयांची मागणी वाढली आहे. दोनच दिवसात कमाल तापमान चार अंश सेल्सीअसने वाढून ३९.२ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे. या आठवड्यात तापमानामध्ये सातत्याने वाढ झाली. जशी कमाल तापमानात वाढ झाली तशी किमान तापमानामध्येही वाढ झाली आहे. शनिवारी कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सीअस असल्याचे नोंद ममुराबाद योथील हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर झाली आहे. उकाडा आणि घामाच्या धारादिवसा प्रचंड उकाडा होतो. दुपारच्या वेळेस रस्त्यावरून वाहनाने किंवा पायी जाताना उन्हाचे चटके बसत आहे. घामाच्या धारा लागत असून, उन्हापासून संरक्षणासाठी बागायतदार रुमाल, गॉगल्स यांचा वापर वाढला आहे. आर्द्रता ५६ टक्के असल्याने उकाडाही जाणवू लागला आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शीतपेयांची मागणीदेखील अलीकडे वाढली आहे. यामुळे शीतपेय विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढली आहे. उसाचा रस व कोल्डड्रीक्सला मागणीसध्या उसाच्या रसाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. तसेच विविध कंपन्यांतर्फे निर्मित कोल्डड्रीक्सनाही मागणी वाढली आहे. उसाच्या रसाला मागणी असल्याने फिरत्या रसवंत्या शहरात सुरू झाल्या आहेत. कुलर, वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वितमागील काळात म्हणजेच या महिन्याच्या सुरुवातीला कुलर व वातानुकूलित यंत्रणांचा फारसा वापर होत नव्हता. परंतु या आठवड्यात जशी तापमानात वाढ होत गेली तसा कुलर व वातानुकूलित यंत्रणांचा वापरही वाढला आहे. किमान तापमान १७ अंश सेल्सीअस व आर्द्रता ५६ टक्क्यांपर्यंत असल्याने रात्रीही उकाडा होतो. बर्फ, थंड पाणी यांचा वापरही वाढल्याचे चित्र आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरणशनिवारी दुपारी २.३० वाजेनंतर आकाशात ढग जमा झाले. वाराही सुटला. वार्याचा वेग काही काळ अधिक व नंतर कमी झाला. मध्येच ऊन पडत होते. सायंकाळपर्यंत हा ऊन सावलीचा खेळ सुरू होता. ढगाळ वातावरणामुळे मात्र उन्हापासून दुपारी काहीसा दिलासा मिळाला. मागील काही दिवसांचे कमाल तापमान(तापमान अंश सेल्सीअसमध्ये)१० मार्च- ३६.६११ मार्च ३७.६१२ मार्च- ३९.२