भरधाव एस.टी.बसने चिरडले टेम्पोला टेम्पो चालक ठार : वावडदा-वडली दरम्यान झाला अपघात, १६ जण जखमी
By Admin | Published: July 12, 2016 12:08 AM2016-07-12T00:08:28+5:302016-07-12T00:08:28+5:30
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या एस.टी.बसने समोरुन येणार्या टेम्पोला जोरदार चिरडल्याने त्यात टेम्पोचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात सोनु उर्फ प्रशांत भगवान वाघ (वय २८ रा.कृष्णापुरी, पाचोरा) हा टेम्पो चालक ठार झाला आहे, तर बस व टेम्पो अशा दोन्ही वाहनातील १६ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजता वावडदा-वडली या दरम्यान रसवंती जवळ झाला. अपघात इतका भयंकर होता, की, टेम्पो रस्त्यावरून थेट शेतात गेलेला आहे.
ज गाव: भरधाव वेगाने जाणार्या एस.टी.बसने समोरुन येणार्या टेम्पोला जोरदार चिरडल्याने त्यात टेम्पोचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात सोनु उर्फ प्रशांत भगवान वाघ (वय २८ रा.कृष्णापुरी, पाचोरा) हा टेम्पो चालक ठार झाला आहे, तर बस व टेम्पो अशा दोन्ही वाहनातील १६ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजता वावडदा-वडली या दरम्यान रसवंती जवळ झाला. अपघात इतका भयंकर होता, की, टेम्पो रस्त्यावरून थेट शेतात गेलेला आहे.पाचोरा येथील महावीर केटरर्सची जळगाव येथे राधाकृष्ण मंगल कार्यालयात ऑर्डर होती. त्या कामासाठी मालक प्रकाश सुगनचंद बाफना हे मजुरांना घेऊन टेम्पोने (क्र. एम.एच.२२-१३८१) जळगावात आले होते. संध्याकाळी पाच वाजता तेथील काम आटोपून पाचोरा येथे परत जात असताना वावडदा-वडलीच्या दरम्यान पाचोरा अगाराच्या पाचोरा-जळगाव (क्र.एम.एच.२० डी.एल.२२८५)या बसने टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यात टेम्पोचा चक्काचूर झाला.अपघातात ही बस टेम्पोला शेतात घेऊन गेली.उपचारापूर्वीच चालकाचा मृत्यूया अपघातात गंभीर जखमी झालेल्या सोनू या चालकाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाला. केटरर्सचे मालक प्रकाश बाफना (वय ५३ रा), अजय संजय रक्षे (वय १७), मंगेश नाना चंदनशिव (वय १९), विकान नाना चंदनशिव (वय २२), गणेश अभिमन्यू सौदागर (वय १९), मोसीन अब्दुल समद देशमुख (वय ४५) सर्व रा.पाचोरा व चॉँद खा (रा.कोल्हे, ता.पाचोरा) हे टेम्पोतील कामगार जखमी झाले आहेत. त्यातील गंभीर जखमी झालेल्यांनी जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. टेम्पोमध्ये बारा जण होते. मयत सोनु हा अविवाहित होता, असे त्याच्या सोबत असलेल्यांनी सांगितले. वडीलही चालक आहेत.बसमधील जखमी प्रवाशीरामकृष्ण विश्वनाथ जाधव (वय ४८ रा.विटनेर, ता.जळगाव), कैलास युवराज पाटील (वय २८ ), शालुबाई शिवदास पाटील (वय ४५), लिलाबाई भगवान पाटील (वय ६५), कमलबाई शामराव पाटील (वय ६०), जागृती अरुण पाटील (वय १०) सर्व रा.किनगाव ता.यावल व बसचा वाहक वाल्मिक जगन्नाथ अहिरे (वय ४० रा.भडगाव) आदी जखमी झाले आहेत. चालक मगराज दशरथ भागवत (रा.गिरड, ता.पाचोरा) हादेखील जखमी झाला आहे. तो घटनास्थळापासूनच गायब झाला होता.