विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी शाळेला दहा लाखांचा दंड
By admin | Published: February 21, 2017 04:50 PM2017-02-21T16:50:00+5:302017-02-21T16:51:02+5:30
उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका शाळेच्या प्रशासनाला विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
रेबेका, दि. 21 - उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका शाळेच्या प्रशासनाला विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.
येथील शाळेत 2003 मध्ये 16 वर्षीय विद्यार्थ्याचा दम्याचा झटका येऊन मृत्यू झाला होता. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली होती. यावर आयोगाच्या एका पॅनलने शाळेकडून होणा-या विद्यार्थ्यांच्या निष्काळजीपणाबाबत खडेबोल सुनावले. तसेच, प्रत्येक शाळांमधून प्राथमिक उपचार पेटी असते. मात्र या शाळेत नसल्याचे निदर्शनास आले. या विद्यार्थ्याला ज्यावेळी झटका आला. त्यावेळी शाळेच्या प्रशासनाने त्याचे नातेवाईक येण्याची वाट पाहिली. त्यामुळे बराच वेळ वाया गेला आणि त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांची वाट पाहण्यापेक्षा विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करायला हवे होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना कळवता आले असते, असे आयोगाने म्हटले आहे.
दरम्यान, या विद्यार्थ्याची वैद्यकीय स्थिती शाळेच्या प्रध्यापकांना माहीत होती, असे या विद्यार्थ्याच्या वडिलांनी म्हटले आहे. तसेच, ज्यावेळी या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी शाळेच्या प्रशासनाऐवजी दुस-या विद्यार्थ्याकडून याबाबत समजले, असेही विद्यार्थ्याच्या वडिलांनी म्हटले आहे.