अतिरेकी म्हणून अटक केलेले दहा जण सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2016 03:11 AM2016-05-10T03:11:35+5:302016-05-10T03:11:35+5:30

जैश-ए-महमद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी ३ मे रोजी अटक केलेल्या दहाही जणांना सोडून देण्यात आले आहे

Ten people who were arrested as terrorists were released | अतिरेकी म्हणून अटक केलेले दहा जण सुटले

अतिरेकी म्हणून अटक केलेले दहा जण सुटले

Next

नवी दिल्ली : जैश-ए-महमद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी ३ मे रोजी अटक केलेल्या दहाही जणांना सोडून देण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांना कोणताही पुरावा न आढळल्याने त्यांना सोडण्यात आले.
दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील देवबंद येथून दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने एकूण १३ जणांना अटक केली होती. दिल्लीत दहशतवादी संघटनेशी संबंधित इतके तरुण पकडल्याच्या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र यापैकी कोणाचाही दहशतवादाशी वा संघटनांशी संबंध असल्याचे पोलिसांना तपासामध्ये आढळून आले नाही. त्यामुळे १0पैकी चार जणांची शनिवारी सुटका करण्यात आली. उरलेल्या सहा जणांना सोमवारी सोडण्यात आले.
अटक केलेल्या तरुणांना भविष्यात दहशतवादाकडे वळू नये, यासाठी त्यांची मानसोपचार तज्ज्ञामार्फत समजूत घालण्यात आली आहे. तसेच आवश्यकता भासेल, तेव्हा त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

Web Title: Ten people who were arrested as terrorists were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.