दहा हजारांची अवैध वाळू जप्त

By admin | Published: June 12, 2015 05:38 PM2015-06-12T17:38:09+5:302015-06-12T17:38:09+5:30

भोकर : शहरातील आंबेडकर चौकात अवैध वाळूचा टिप्पर पकडून पोलिसांनी संबंधितांविरूद्ध गुन्हा नोंदविला़

Ten thousand illegal sand seized | दहा हजारांची अवैध वाळू जप्त

दहा हजारांची अवैध वाळू जप्त

Next
कर : शहरातील आंबेडकर चौकात अवैध वाळूचा टिप्पर पकडून पोलिसांनी संबंधितांविरूद्ध गुन्हा नोंदविला़
एम़एच़२६-ए़डी़२१४४ या क्रमांकाच्या टिप्परमध्ये १० हजार रुपयांची चार ब्रास वाळू अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ पोलिस उपनिरीक्षक विनोद झळके यांनी कारवाई करून आरोपींविरूद्ध गुन्हा नांेदविला़ जमादार पोहरे तपास करीत आहेत़

जुगार्‍यांना पकडले
मुदखेड : येथील रेल्वे स्टेशन रोडवर जुगार खेळतांना पोलिसांनी एकाकडून दोन मोबाईल, नगदी व जुगाराचे साहित्य असा ४ हजार २७० रुपयांचा ऐवज जप्त केला़ फौजदार संतोष शिरसेवाड यांनी ही कारवाई केली़ जमादार राठोड तपास करीत आहेत़

गळफास लावून आत्महत्या
मुदखेड : गडग्याळवाडी ता़मुदखेड येथे गंगाधर धुरपतराव पेंटलवाड (वय ५०) यांनी १० जून रोजी सायंकाळी घरातील पत्र्याच्या लाकडास गळफास लावून आत्महत्या केली़ आत्महत्येचे कारण कळाले नाही़ अंकुश पेंटलवाड यांनी या घटनेची फिर्याद दिली़ जमादार सूर्यवंशी तपास करीत आहेत़

अवैध शिंदी जप्त
नांदेड : शहरातील लक्ष्मीनगर येथील एका आरोपीकडून ३ हजार २०० रुपयांची अवैध शिंदी पोलिसांनी जप्त केली़ जमादार ताहेरअली खाँ पठाण यांनी १० जून रोजी ही कारवाई केली़ तपास सपोउपनि सूर्यतळ करीत आहेत़

शिवानी तुप्तेवार तालुक्यात प्रथम
हिमायतनगर : येथील राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची शिवानी तुप्तेवार ही ९५़४० टक्के गुण घेवून तालुक्यात प्रथम आली़ आशिष राऊत याने ९५ टक्के गुण घेवून द्वितीय तर वैष्णवी उत्तरवार हिने ९३ टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक प्राप्त केला़ शाळेचा निकाल ७१़१९ टक्के आहे़ १२वीचा निकालही ९२़९३ टक्के लागला होता़ कोणतीही शिकवणी न लावता शिवानी तुप्तेवार हिने गुण प्राप्त केले़ गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला़ यावेळी प्रभारी मुख्याध्यापक ए़आऱअनगुलवार, पर्यवेक्षक के़आऱ दिक्कावार, बी़आऱपवार, जी़डी़ कापसे, डी़एस़कोंडामंगल, एस़टी़ उत्तरवार, तगडपल्लेवार मॅडम, तामशेटवार मॅडम, व्ही़पी़आलेवाड, वाय़एस़बाचावार, के़बी़शेन्नेवाड उपस्थित होते़

Web Title: Ten thousand illegal sand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.