दोन किंवा अधिक पॅन कार्ड बाळगणाऱ्यास १० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 06:40 AM2019-01-15T06:40:37+5:302019-01-15T06:40:57+5:30
दुसरे ताबडतोब करा परत; डीमॅट खात्यास्वतंत्र कार्ड नियमबाह्य
नवी दिल्ली : एक पॅन क्रमांक एकापेक्षा जास्त व्यक्तींना घेता येत नाही त्याचप्रमाणे एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन क्रमांकही ठेवता येत नाहीत. एकापेक्षा जास्त पॅन क्रमांक असल्यास प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम २७२ बी या कलमान्वये १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे दोन वा त्याहून अधिक पॅन कार्ड असलेल्यांनी एक कार्ड स्वत:कडे ठेवून दुसरे वा त्याहून अधिक असलेली कार्ड परत करणे आवश्यक आहे.
याच कायद्यान्वये एकापेक्षा जास्तीचे पॅनकार्ड त्वरित प्राप्तिकर विभागास परत करणे आवश्यक आहे. डीमॅट खाते आणि प्राप्तिकर भरणा करण्यासाठी स्वतंत्र पॅन कार्ड काही लोक वापरतात. तथापि, हे नियमबाह्य आहे. पॅनकार्ड हरवल्यास अनेक जण नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करतात. वास्तविकपणे हेही चूक आहे. नव्या कार्डाऐवजी त्यांनी डुप्लिकेट कार्डसाठी अर्ज करायला हवा. त्यासाठी आॅनलाइनही अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे.
एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्यास ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे ते प्राप्तिकर विभागास परत केले जाऊ शकतात. नावातील बदल अथवा पत्त्यातील बदल यासाठी वापरल्या जाणाºया फॉर्मसारखाच सामान्य फॉर्म त्यासाठी भरून द्यावा लागतो.
बेकायदा कार्ड परत करणे सोपे आणि सुलभ
च्‘रिक्वेस्ट फॉर न्यू पॅनकार्ड ऑर/अँड चेंजेस ऑर करेक्शन इन पॅन डाटा’ या नावाचा हा फॉर्म एनएसडीएल ऑफिसच्या वेबसाईटवर आॅनलाईन भरता येतो. या वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करून तो ऑफलाइन भरण्याचीही सोय आहे.
च् जे पॅनकार्ड तुम्हाला कायम ठेवायचे आहे, त्याची माहिती सर्वांत वरच्या रकान्यात भरावी. जे पॅन क्रमांक तुम्हाला परत करायचे आहेत, त्याची माहिती ११ क्रमांकाच्या रकान्यात भरावी. जे पॅनकार्ड परत करायचे आहे, त्यांची कॉपी सोबत जोडावी.हा अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक वापरावी. ँ३३स्र२://६६६.ङ्मल्ल’्रल्ली२ी१५्रूी२.ल्ल२’ि.ूङ्मे/स्रेंं/ील्लवि२ी१फीॅ्र२३ी१उङ्मल्ल३ंू३.ँ३े’