मारहाणप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

By admin | Published: July 30, 2016 10:39 PM2016-07-30T22:39:14+5:302016-07-30T22:54:26+5:30

नाशिक : घोटी येथे जिल्हा परिषदेच्या वतीने गटार टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी नळ तुटल्यामुळे मजुराला तलवारीने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्‘ाप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित आरोपी बाळा भगवान तोकडे यास दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Ten years of forced labor | मारहाणप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

मारहाणप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

Next

नाशिक : घोटी येथे जिल्हा परिषदेच्या वतीने गटार टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी नळ तुटल्यामुळे मजुराला तलवारीने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्‘ाप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित आरोपी बाळा भगवान तोकडे यास दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मागील वर्षी घोटी गावात भुयारी गटारीचे काम सुरू होते. त्यावेळी काम करणार्‍या ठेकेदाराच्या मजुरांकडून तोकडेच्या घराचा नळ तुटल्याने संतप्त होत त्याने मजूर दीपक सोमनाथ नागरे यास तलवारीने मारहाण करत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्याचा शनिवारी (दि.३०) न्यायालयाने निकाल देत संशयित तोकडे यास प्रत्येकी दोन हजार व दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात तोकडेविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश एन. बी. भोस यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. सरकारी पक्षातर्फे ॲड. प्रमोद पाटील यांनी युक्तिवाद करत बारा साक्षीदार तपासले. त्यात तोकडे विरोधात सबळ पुरावे आढळल्याने न्यायालयाने त्याला सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: Ten years of forced labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.