दहा वर्षांनी भरला मुंजेवाडी तलाव
By admin | Published: October 5, 2016 12:20 AM2016-10-05T00:20:56+5:302016-10-05T00:22:21+5:30
जलसंधारणास फायदा : जवळा गावाचा पाणी प्रश्न सुटला
जलसंधारणास फायदा : जवळा गावाचा पाणी प्रश्न सुटला
जामखेड : तालुक्यातील जवळा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला मुंजेवाडी तलाव दहा वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला. जलसंधारणचे कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा वर्षभराचा प्रश्न मिटला. यामुळे जवळेकरांनी आनंदोत्सव साजरा केला. गावकर्यांनी तलावाचे जलपूजन करून दरवर्षी तलाव भरण्याची प्रार्थना केली.
जवळा गावातील नांदणी नदीचे पाच किलोमीटर खोलीकरण व रुंदीकरण केले. तसेच अकरा बंधार्यांचे काम हाती घेतले असून पाच बंधारे पूर्ण झाले आहेत. तसेच कंपार्टमेंट बंडीग, नाला बंदिस्ते, सिमेंट नाले आदी कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत.पंधरा दिवसांपासून नान्नज व जवळा परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसाने जलसंधारण कामातून पाच टी. एम. सी. पाणी अडले आहे. पंधरा दिवसांपासून आजतागायत पडणार्या पावसाने जवळा जलमय झाले आहे. दहा वर्षांनंतर मुंजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून गावाचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा वर्षभराचा प्रश्न मिटला.
मुंजेवाडी तलावातील पाण्याचे जलपूजन ज्योती क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आजीनाथ हजारे,उपाध्यक्ष दशरथ हजारे ,भाजपा अल्पसख्यांक मोर्चा जिल्हा चिटनीस हबीब शेख, नान्नजचे माजी सरपंच सुनील हजारे, माजी उपसरपंच सतोंष मोहळकर, संजय बोराटे, शरद कळसकर आदींनी विधीपूर्वक केले.
..................................
फोटो ०४जामखेड मुंजेवाडी तलाव
ओळ: मुंजेवाडी (ता. जामखेड) तलावातील पाण्याचे जलपूजन ज्योती क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आजीनाथ हजारे,उपाध्यक्ष दशरथ हजारे ,भाजपा अल्पसख्यांक मोर्चा जिल्हा चिटनीस हबीब शेख, नान्नजचे माजी सरपंच सुनील हजारे, माजी उपसरपंच सतोंष मोहळकर, संजय बोराटे, शरद कळसकर आदींनी विधीपूर्वक केले.