तांबाळे येथील नराधमास १० वर्ष सक्तमजुरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा

By admin | Published: February 21, 2016 12:31 AM2016-02-21T00:31:59+5:302016-02-21T00:31:59+5:30

हॅलो ग्रामीण व सेंट्रल डेस्कसाठी

Ten years of rigorous imprisonment for minor girls in Tambaale: District and sessions court sentenced to death | तांबाळे येथील नराधमास १० वर्ष सक्तमजुरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा

तांबाळे येथील नराधमास १० वर्ष सक्तमजुरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा

Next
लो ग्रामीण व सेंट्रल डेस्कसाठी

जळगाव : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दोषारोप सिद्ध झाल्याने तांबोळे (ता.चाळीसगाव) येथील भाऊसाहेब नाना पाटील (वय २६) या आरोपीस प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी शनिवारी १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, चाळीसगाव येथील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी २५ मे २०१३ रोजी तिच्या मैत्रिणीसह उरूस पाहण्यासाठी गेलेली होती. त्या वेळी तिला तिचा विक्की नामक मित्र भेटला होता. ते आपसात बोलत असल्याने पाहून मुलीच्या काकाने विक्कीला मारहाण केली होती. मारहाणीत विक्कीचा भ्रमणध्वनी खाली पडला. तो भ्रमणध्वनी आरोपी भाऊसाहेबने उचलला होता. घटनेच्या दुसर्‍या दिवशी पीडित मुलीने विक्कीच्या भ्रमणध्वनीवर फोन केला. तेव्हा भाऊसाहेबने मी विक्कीचा मोठा भाऊ बोलत असल्याचे सांगून विक्की नाशिकला रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याने तुला भेटायला बोलावले आहे, असे सांगितले होते. त्याला होकार दिल्याने भाऊसाहेबने तीन जून २०१३ रोजी पीडित मुलीला चाळीसगाव येथून त्याच्या सोबत नेले. तेथून तो तिला त्याचा शेवगाव (जि.अहमदनगर) येथील मित्र शंकर पाटील-गोरे याच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने मुलीवर अत्याचार केले. पाच जून २०१३ रोजी पीडित मुलीने तिच्या कुटुंबीयांना फोन करून हकीकत सांगितली. तेव्हा तिचे वडील व काकांनी तिला घरी परत आणले. त्यानंतर तिच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात भाऊसाहेब विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

नऊ जणांच्या महत्त्वपूर्ण साक्ष
गुन्‘ाच्या तपासानंतर तपासाधिकारी व्ही.एस. देवरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला प्र.जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात चालला. सरकारपक्षातर्फे ॲड.संभाजी पाटील यांनी पीडित मुलगी, तपासाधिकार्‍यांसह एकूण नऊ जणांच्या साक्ष नोंदवल्या. त्या ग्रा‘ धरल्याने आरोपीवर दोषारोप सिद्ध झाला. आरोपीतर्फे ॲड.एस.के. कौल यांनी काम पाहिले.

Web Title: Ten years of rigorous imprisonment for minor girls in Tambaale: District and sessions court sentenced to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.