४४ वाळू गटांसाठी निविदा प्रसिद्ध १९ रोजी निविदा उघडणार : जिल्हाभरातून मागविले प्रस्ताव

By admin | Published: December 3, 2015 12:36 AM2015-12-03T00:36:31+5:302015-12-03T00:36:31+5:30

जळगाव : जिल्‘ातील गिरणा, तापी, पांझरा, बोरी व बहुळा या नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावाची ऑन लाईन प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार बुधवार २ रोजी ४४ वाळू गटांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Tender for 44 Sand Groups will be opened on the famous 19th November: Proposed from the district | ४४ वाळू गटांसाठी निविदा प्रसिद्ध १९ रोजी निविदा उघडणार : जिल्हाभरातून मागविले प्रस्ताव

४४ वाळू गटांसाठी निविदा प्रसिद्ध १९ रोजी निविदा उघडणार : जिल्हाभरातून मागविले प्रस्ताव

Next
गाव : जिल्‘ातील गिरणा, तापी, पांझरा, बोरी व बहुळा या नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावाची ऑन लाईन प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार बुधवार २ रोजी ४४ वाळू गटांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
१९ रोजी निविदा उघडणार
जिल्हा प्रशासनाने वाळू गटांची ऑन लाईन लिलावाची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून २ रोजी ४४ वाळू गटांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात वाळू स्थळाचे नाव, नदीचे नाव, वाळू साठ्यालगतचे गट क्रमांक, उपलब्ध होऊ शकणारा वाळू साठा, तसेच लिलावासाठी प्रस्तावित अपसेट प्राईज याबाबत माहिती देण्यात आली आहे. ३ ते १७ डिसेंबर दरम्यान निविदा मागविण्यात येणार आहे. १९ रोजी आलेल्या निविदा उघडण्यात येणार आहे.
या वाळू गटांचे होणार लिलाव
अमळनेर तालुका- मांडळ भाग १, पांझरा नदी, मांडळ भाग-२, पांझरा, मुडी प्र.डां., पांझरा, बोदर्डे, पांझरा. चोपडा तालुका- धुपे खुर्द. तापी, घाडवेल, तापी, वाळकी शेंदणी, मालखेडा, खाचणे, तांदलवाडी भाग-१ , पिंप्री. रावेर तालुका- दोेधे, मुक्ताईनगर तालुका- पातोंडी, तापी, पिंप्रीनांदू , भोकरी. जळगाव तालुका- जामोद, गिरणा, कुवारखेडे, गिरणा, नागझीरी, गिरणा, धानोरा बु.२, गिरणा. एरंडोल तालुका- उत्राण गु.ह. भाग- ४, गिरणा, हनुमंतखेडेसीम भाग १, गिरणा, धरणगाव तालुका - बांभोरी प्र.चा. भाग-१, गिरणा, प्र.चा.भाग १ कवठळ, गिरणा, चांदसर बु., गिरणा, चोरगाव, गिरणा, रेल, गिरणा, बाभुळगाव, गिरणा, पारोळा तालुका- टोळी तामसवाडी, बोरी नदी. पाचोरा तालुका- दुसखेडा, बहुळा, परधाडे, गिरणा, माहिजी, गिरणा, कुरंगी भाग-१, गिरणा, वरसाडे प्र.बो., गिरणा, भडगाव तालुका- पिंपळगाव बु., गिरणा, कराब-वडघे, गिरणा, वडजी भाग २, गिरणा, टोणगाव गिरणा, सावदे, गिरणा, पांढरद, गिरणा, पिचर्डे, गिरणा, वाडे, गिरणा, दलवाडे, गिरणा, कोठली, गिरणा. या वाळूगटांचा समावेश आहे.

Web Title: Tender for 44 Sand Groups will be opened on the famous 19th November: Proposed from the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.