‘स्वच्छ भारत’साठी तेंडुलकरांचा आवाज
By admin | Published: September 28, 2015 11:35 PM2015-09-28T23:35:24+5:302015-09-28T23:35:24+5:30
स्वच्छ भारत या मोहिमेसाठी माजी क्रिकेटपटू खासदार सचिन तेंडुलकर यांनी आपला आवाज दिला आहे. रालोआ सरकारने स्वच्छ भारत ही जनचळवळ व्हावी
नवी दिल्ली : स्वच्छ भारत या मोहिमेसाठी माजी क्रिकेटपटू खासदार सचिन तेंडुलकर यांनी आपला आवाज दिला आहे. रालोआ सरकारने स्वच्छ भारत ही जनचळवळ व्हावी यासाठी पुढाकार घेत जनजागृतीवर भर दिला आहे. शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने या मोहिमेचा भाग म्हणून हे गीत साकारले आहे. येत्या २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ते जारी केले जाणार असून तो स्वच्छ भारत मोहिमेचा पहिला वर्धापनदिनही आहे.
प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी हे गीत लिहिले असून मुकेश भट यांनी तयार केलेल्या व्हिडिओत जोशी यांनाही दाखविण्यात आले आहे. सचिन यांनी काही ओळी गात रेकॉर्डिंगच्या वेळी काही सूचनाही केल्या आहेत.
स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे ही सामूहिक जबाबदारी असून या मोहिमेला हातभार लावण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी हे गीत तयार करण्यात आल्याचे नागरी विकास मंत्रालयाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करण्यासाठी तिला जनआंदोलनाचे स्वरूप दिले जावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला या गाण्याची ध्वनिफित जारी होण्याची अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)