तणाव वाढला! भारत-नेपाळ सीमेवर अंदाधुंद गोळीबार, ४ भारतीय जखमी तर एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 01:15 PM2020-06-12T13:15:01+5:302020-06-12T13:15:36+5:30
नेपाळी संसदेनेही यासंदर्भात एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये भारताचे काही सीमाभाग नेपाळचे असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.
सीतामढी - आताच्या घडीची मोठी बातमी बिहारमधील सीतामढीहून पुढे येत आहे, तेथे भारत-नेपाळ सीमा सीमेवर नेपाळ पोलिसांकडून प्रचंड गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराच्या घटनेत 4 भारतीयांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत, यापैकी एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. भारत आणि नेपाळ (भारत-नेपाळ विवाद) सीमेबाबत वाद आहे. नेपाळी संसदेनेही यासंदर्भात एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये भारताचे काही सीमाभाग नेपाळचे असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.
सीतामढी - भारत-नेपाळ सीमा सीमेवर नेपाळ पोलिसांकडून प्रचंड गोळीबार सुरु, ४ भारतीय जखमी तर एकाचा मृत्यू
— Lokmat (@MiLOKMAT) June 12, 2020
दोघांची गंभीर स्थिती
अंदाधुंद गोळीबारात जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सीतामढीच्या सोनमर्सा सीमावर्ती भागातील जानकीनगर गावची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत-नेपाळ सीमेवर वाद झाला होता, त्यानंतर नेपाळ पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेनंतर सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नव्या नकाशावरून सध्या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. भारताचे म्हणणे आहे की, या संपूर्ण प्रकरणामुळे दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे संकट उभे राहिले आहे. वाटाघाटीपूर्वी नेपाळला भारताचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे. संपूर्ण प्रकरण नेपाळच्या नवीन नकाशाबाबत घडले आहे. या नवीन नकाशामध्ये नेपाळने एकूण 395 चौरस किमी क्षेत्रफळ दर्शविले आहे. लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कलापाणी व्यतिरिक्त गुंजी, नाभी आणि काटी या गावांचा समावेश आहे. नेपाळने आपल्या नकाशामध्ये कालापाणीचे 60 चौरस किलोमीटर क्षेत्र स्वतःचे म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे नेपाळने ३९५ चौरस किलोमीटर लिंपियाधूरावर आपला असल्याचा दावा केला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नकाशाला मान्यता देण्यात आली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले
थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला
Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही