तरुणीच्या छेडखानीवरुन ममुराबाद येथे तणाव
By admin | Published: June 12, 2016 10:33 PM2016-06-12T22:33:03+5:302016-06-12T22:33:03+5:30
जळगाव: तरुणीला अश्लिल इशारा व छेडखानी केल्याच्या कारणावरुन ममुराबाद येथे रविवारी रात्री दोन गटात वाद होवून तणाव निर्माण झाला होता. छेडखानी करणार्या जावेद नावाच्या तरुणाला दहा ते बारा जणांनी बेदम मारहाण केली. नातेवाईकांनी त्याची सुटका करुन त्याला तातडीने जळगावला रवाना केले. जावेद हा जळगाव येथे बियाण्याच्या दुकानावर कामाला आहे. रात्री नऊ वाजता त्याने रस्त्याने जातांना एका तरुणीची छेड काढली. हा प्रकार त्या तरुणीने घरात पालकांना सांगितला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जावेद पकडून बेदम मारहाण केली. दोन समाजातील वाद लक्षात घेता तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक सूर्यकांत पाटील, कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील व सहकार्यांनी घटनास्थळ गाठून वातावरण शांत केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
Next
ज गाव: तरुणीला अश्लिल इशारा व छेडखानी केल्याच्या कारणावरुन ममुराबाद येथे रविवारी रात्री दोन गटात वाद होवून तणाव निर्माण झाला होता. छेडखानी करणार्या जावेद नावाच्या तरुणाला दहा ते बारा जणांनी बेदम मारहाण केली. नातेवाईकांनी त्याची सुटका करुन त्याला तातडीने जळगावला रवाना केले. जावेद हा जळगाव येथे बियाण्याच्या दुकानावर कामाला आहे. रात्री नऊ वाजता त्याने रस्त्याने जातांना एका तरुणीची छेड काढली. हा प्रकार त्या तरुणीने घरात पालकांना सांगितला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जावेद पकडून बेदम मारहाण केली. दोन समाजातील वाद लक्षात घेता तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक सूर्यकांत पाटील, कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील व सहकार्यांनी घटनास्थळ गाठून वातावरण शांत केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.