जातीवाचक शिवीगाळाने शनी पेठमध्ये तणाव
By Admin | Published: February 22, 2016 02:14 AM2016-02-22T02:14:58+5:302016-02-22T02:14:58+5:30
जळगाव : जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन तरुणावर हल्ला व त्यानंतर दोन गटात उसळलेल्या दंगलीमुळे शनी पेठ भागात तणावाचे वातावरण कायम आहे. यावेळी अधिकार्यांसह तब्बल शंभराच्यावर कर्मचार्यांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात होता. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दगडफेक करणार्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु होते.
ज गाव : जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन तरुणावर हल्ला व त्यानंतर दोन गटात उसळलेल्या दंगलीमुळे शनी पेठ भागात तणावाचे वातावरण कायम आहे. यावेळी अधिकार्यांसह तब्बल शंभराच्यावर कर्मचार्यांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात होता. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दगडफेक करणार्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु होते.या दगडफेकीत पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्या दालनाजवळही काही जणांनी विटा मारुन फेकल्या होत्या. सहा महिन्यापूर्वीही राष्ट्रपुरुषाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ पोलीस स्टेशनवर दगडफेकीची घटना घडली होती. त्यानंतर रविवारची ही दुसरी घटना आहे.चव्हाणवर दहा ते बारा जणांना केला हल्लारणजित चव्हाण या तरुणावर लल्ला, शोएब, जाकीर, नासीर, अय्याज यांच्यासह दहा ते बारा जणांनी रात्री साडे आठ वाजता कमरेच्या प्याने मारहाण करुन डोक्यात लोखंडी रॉड मारला. हल्लेखोरांची नावे चव्हाण यानेच पोलिसांना सांगितली. दरम्यान, यावेळी काही तरुणांजवळ तलवारीही होत्या असे सांगण्यात आले.जातीवाचक शिवीगाळ का केली, त्याचा जाब विचारल्याने हा हल्ला झाल्याचे चव्हाण याचे म्हणणे असले तरी यामागे आणखी काही वेगळे कारण आहे का? याची पोलीस चौकशी करीत आहेत.घरातून काढल्या सळई व दांडकेपोलीस स्टेशनच्या बाहेर दगडफेक व विटांचा मारा झाल्यानंतर पोलिसांनी संशयास्पद लोकांच्या घरात घुसून झाडाझडती घेतली असता लोखंडी रॉड, सळई व लाकडी दांडके आढळून आली. पोलीस कारवाईच्या भीतीने बहुतांश जणांनी घराला कुलूप लावून पळ काढला होता. तर काही घराच्या गच्चीवर लपून बसले होते.शनी पेठमध्ये छावणीचे स्वरुपया घटनेच्या पार्श्वभूमीवर शनीपेठ परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, सहायक निरीक्षक संदीप पाटील, दीपक गंधाले, उपनिरीक्षक गजानन राठोड, पवन राठोड आदी अधिकार्यांवर पाईंटची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या दिमतीला अतिरिक्त कर्मचारी देण्यात आले होते. शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी मागविण्यात आले होते.