निवडणूक चिन्हासाठी सपामध्ये दंगल, निर्णय ठेवला राखून

By admin | Published: January 13, 2017 05:59 PM2017-01-13T17:59:28+5:302017-01-13T18:07:46+5:30

उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षात चालू असलेल्या दंगलीकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना पक्षाचे सायकल चिन्ह कोणाला मिळणार यासंबंधीचा निर्णय निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे.

Tension in the SP for election symbol, but no decision has been kept | निवडणूक चिन्हासाठी सपामध्ये दंगल, निर्णय ठेवला राखून

निवडणूक चिन्हासाठी सपामध्ये दंगल, निर्णय ठेवला राखून

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षात चालू असलेल्या दंगलीकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना पक्षाचे सायकल चिन्ह कोणाला मिळणार यासंबंधीचा निर्णय निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे. 
 
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव आणि मुलगा अखिलेश यादव यांच्यात सायकल चिन्हावरुन सुरु असलेली लढाई नेमकं कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने चिन्हाच्या दाव्यावरील सुनावणी पूर्ण केली आहे मात्र निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे पुढील कोणत्याही क्षणी हा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात येऊ शकतो.
 
दरम्यान, मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्या गटांनी सायकल चिन्हावर दावा केल्यानंतर, निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून दाखल झालेल्या कागदपत्रांचा अभ्यास केला. आपले समर्थक आमदार, खासदार यांचे हस्ताक्षरातले शपथपत्र आयोगाने या गटांकडे मागितले होते. कोणत्या गटाजवळ किती संख्याबळ आहे, याची माहिती या माध्यमातून समजणार आहे. सपाच्या वादग्रस्त राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे २२९ पैकी २०० आमदार, मोठ्या संख्येने विधान परिषद सदस्य व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 
(आज ठरणार सायकलचा मालक कोण ? निवडणूक आयोग देणार निर्णय)

Web Title: Tension in the SP for election symbol, but no decision has been kept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.