सीमेवरील तणाव वाढला; संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 04:56 AM2020-05-27T04:56:42+5:302020-05-27T04:56:51+5:30

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्वत:च्या बाजूला चीनने पाच हजार सैनिकांची जमवाजमव केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

 Tensions on the border increased; Defense Minister holds meeting | सीमेवरील तणाव वाढला; संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठक

सीमेवरील तणाव वाढला; संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठक

Next

नवी दिल्ली : पूर्व लडाखला लागून असलेल्या चीन व भारत यांच्या दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट व हाणामारीच्या ताज्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सुरक्षा दलांचे संयुक्त प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत व तिन्ही सैन्यदल प्रमुखांसोबत बैठक घेऊन सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्वत:च्या बाजूला चीनने पाच हजार सैनिकांची जमवाजमव केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
सीमेवरील चीनसोबतचा तणाव हा सन २०१७ मधील डोकलाम तणातणीनंतरचा सर्वात तीव्र तणाव आहे. त्यावेळचा तणाव पंतप्रधान मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांच्या भेटीनंतर तब्बल ७३ दिवसांनी निवळला होता.

आताच्या तणावाच्या ताज्या घटना उत्तर सिक्कीममधील नाकू ला, पूर्व लडाखच्या सीमेवर असलेले पँनगाँग क्सो सरोवर व त्याच परिसरातील अन्य ठिकाणी झाल्या आहेत. सीमेवर गस्त घालणाऱ्या आपल्या गस्ती तुकड्यांना चिनी सैनिक अडवतात व दमदाटी करतात, असे भारताचे म्हणणे आहे. याउलट गस्त घालण्याच्या बहाण्याने भारतीय सैनिक आमच्या हद्दीत घुसखोरी करतात, असा चीनचा आरोप आहे.

Web Title:  Tensions on the border increased; Defense Minister holds meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.