बाजार समितीमध्ये तणाव

By admin | Published: July 20, 2016 11:48 PM2016-07-20T23:48:45+5:302016-07-20T23:48:45+5:30

लागलीच मारहाण करणार्‍या महिला पसार झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.

Tensions in the market committee | बाजार समितीमध्ये तणाव

बाजार समितीमध्ये तणाव

Next
गलीच मारहाण करणार्‍या महिला पसार झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.

मारहाण झालेल्या महिलेने लागलीच नजीकचे पोलीस ठाणे गाठले व आपली तक्रार दिल्याची माहिती बाजार समितीने दिली.

पोलीस आल्यानंतर लिलाव सुरू
बाजार समितीमध्ये खरेदीदार महिलेस मारहाण झाल्याने इतर खरेदीदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. लिलावही थांबले होते. नंतर पोलीस बंदोबस्त लागल्यावर लिलाव सुरू झाले.

५०० क्विंटल भाज्यांची विक्री
बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केटमध्ये काही वेळ तणाव होता. परंतु नंतर हा तणाव निवळला. लिलाव सुरू झाले. बुधवारी ५०० क्विंटल भाजीपाल्याची विक्री झाली, अशी माहती बाजार समितीचे सचिव एस.पी.पाटील यांनी दिली.

पोलिसांना पत्र
बाजार समिती प्रशासनाने रोज तणाव निर्माण होत असल्याने व आता मारहाणीच्या घटना व्हायला लागल्याने पोलिसांना पत्र दिले आहे. लिलावांच्या सुरुवातीलाच पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी विनंती पोलीस प्रशासनाला केल्याची माहिती बाजार समितीचे सचिव पाटील यांनी दिली.


Web Title: Tensions in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.