Railway Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी, ७०० हून अधिक पदांसाठी भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 04:00 PM2022-02-11T16:00:01+5:302022-02-11T16:00:56+5:30
Indian Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये काम करू इच्छिणारा पात्र उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये एकूण ७५६ विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने २०२१-२२साठी अप्रेंटीसच्या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.
नवी दिल्ली - रेल्वेमध्ये काम करू इच्छिणारा पात्र उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये एकूण ७५६ विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने २०२१-२२साठी अप्रेंटीसच्या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार रिक्त पदांची एकूण संख्या ७५६ असून, या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही ७ मार्च २०२२ आहे.
या भरतीप्रक्रियेसाठी पात्र उमेदवार RRCचे अधिकृत संकेतस्थळ rrcbbs.org.in च्या माध्यमातून अर्ज करू शकतात. या भरतीप्रक्रियेमध्ये कॅरिज रिपेयर वर्कशॉप, मंचेश्वर, भुवनेश्वर येथून फिटर ४८, वेल्डर जी एंड ई ३२, इलेक्ट्रिशियन २० पदे, मशिनिस्ट ११ पदे, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक ६ पदे, वायरमेन ९ पदे, कारपेंटर २९ पदे, शीट मेटल वर्कर २० पदे, पेंटर ९ पदे, मेकॅनिक एमव्ही ६ पदे अशा एकूण १९० पदांची भरती होणार आहे.
यासह खुर्दा रोड डिव्हिजन २३७ पदे, वाल्टेयर डिव्हिजन २६३ पदे संभलपूर मंडल ६६ पदांची भरती होणार आहे.
या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावीची परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा ही ५० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेले असले पाहिजेच. तसेच एनसीव्हीटी/एससीव्हीटी कडून संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेटसुद्धा असले पाहिजे.
अप्रेंटिसच्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय हे २४ वर्षे असले पाहिजे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल. अर्च करण्यासाठी उमेदवाराला १०० रुपयांचे प्रवेश शुल्क द्यावे लागेल.