भीषण दुर्घटना ! 50 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 2 ठार 40 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 11:14 PM2022-07-09T23:14:57+5:302022-07-09T23:24:59+5:30
बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाचपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे
मुंबई/नाशिक : सापुतारापासून पुढे काही अंतरावर असलेल्या डांगच्या घाटामध्ये अडीचशे फूट खोल दरीत बस कोसळली. सुरतच्या अमरोली येथील एका खाजगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची सहल डांगमध्ये आली होती. या बसमध्ये 50 जण प्रवास करत होते. परतीचा प्रवास करत असताना अचानक बस दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली.
डांग जिल्ह्यातील पंपासरोवर, शबरीधामसारख्या आदी ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची सहल आणण्यात आली होती. बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 महिला प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, 40 पेक्षा अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना अहवा आणि सुरतच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Gujarat | A bus carrying over 50 passengers fell into a gorge near Saputara in Dang district. Police reached the spot. Rescue operation underway. Several injured in the accident which occurred due to a tyre blast: MoS Home Harsh Sanghavi
— ANI (@ANI) July 9, 2022
दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. येथील परिस्थितीवर गृह राज्यमंत्री हर्ष संघवी लक्ष ठेऊन असून त्यांनी तात्काळ मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
गुजरात: डांग जिले के सापुतारा के पास 50 से अधिक यात्रियों को ले जा रही एक बस खाई में गिर गई। हादसे में कई घायल हुए हैं।पुलिस मौके पर पहुंची, रेस्क्यू ऑपरेशन जारी है। https://t.co/ePMxFiggQMpic.twitter.com/KKvV27fK2Y
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2022