तामिळनाडूत भीषण अपघात! रात्रीच्या अंधारात पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळली; 8 मृत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 10:04 PM2023-09-30T22:04:22+5:302023-09-30T22:04:30+5:30

अनेकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कुन्नूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Terrible accident in Tamil Nadu! A bus full of tourists plunged into a valley in the dark of night; 8 dead in Marapalam accident | तामिळनाडूत भीषण अपघात! रात्रीच्या अंधारात पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळली; 8 मृत

तामिळनाडूत भीषण अपघात! रात्रीच्या अंधारात पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळली; 8 मृत

googlenewsNext

तामिळनाडूतील कुन्नूर येथे काही वेळापूर्वीच भीषण अपघात झाला आहे. पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक लोक जखमी आहेत. 

जखमींवर नजिकच्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. बस उटीहून मेट्टुपालयमला जात होती. मरापलमजवळ अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ५५ पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळली. पोलिसांना माहिती मिळताच स्थानिक लोकांसह बचावकार्य सुरू केले.

या घटनेत सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत, असे कोईम्बतूर झोनचे डीआयजी सरवना सुंदर यांनी सांगितले आहे. रात्रीची वेळ होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सुमारे 100 फूट खोल खड्ड्यात पडली. स्थानिक लोक मदतीसाठी धावले, मात्र अंधारामुळे खूप अडचणी आल्या. पोलिस आल्यानंतर प्रकाशाची सोय करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. 

अनेकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कुन्नूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

Web Title: Terrible accident in Tamil Nadu! A bus full of tourists plunged into a valley in the dark of night; 8 dead in Marapalam accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात