एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 06:26 AM2024-10-25T06:26:37+5:302024-10-25T06:26:56+5:30

या हल्ल्याचे वृत्त कळताच लष्कराने मोठी कुमक त्या भागात पाठविली आहे

Terror attack near LoC, two jawans martyred; Cowardly act again in Jammu; Dain Hamal was also killed | एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार

एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे बोटा पत्थर भागात नागीन परिसरामध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी लष्कराच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात २  जवान शहीद झाले असून दाेन हमालांचा मृत्यू झाला आहे.  तर ४ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

या हल्ल्याचे वृत्त कळताच लष्कराने मोठी कुमक त्या भागात पाठविली आहे. श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान २ जवानांचा मृत्यू झाला, तर ५ जवानांवर उपचार सुरू आहेत. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, नागीन भागात लष्कराचे जवान व दहशतवाद्यांची चकमक रात्री उशीरापर्यंत सुरू होती. गुुरुवारच्या हल्ल्यात शहीद झालेले जवान व मरण पावलेल्या हमालाचे नाव अद्याप कळू शकलेली नाहीत. या हल्ल्यात तीन पेक्षा जास्त दहशतवादी सामील असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Web Title: Terror attack near LoC, two jawans martyred; Cowardly act again in Jammu; Dain Hamal was also killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.