टेरर फंडिंग : एनआयएने जप्त केल्या 36 कोटी 34 लाखांच्या जुन्या नोटा, नऊ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 06:28 PM2017-11-07T18:28:07+5:302017-11-07T18:31:26+5:30
जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना होणाऱ्या वित्तपुरवठ्या विरोधात एनआयएकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, अशाच एका कारवाईत एनआयएने 36 कोटी, 34 लाख, 78 हजार, 500 रुपयांच्या
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना होणाऱ्या वित्तपुरवठ्या विरोधात एनआयएकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, अशाच एका कारवाईत एनआयएने 36 कोटी, 34 लाख, 78 हजार, 500 रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जप्त केल्या असून, या प्रकरणी 9 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Delhi: NIA has seized demonetised currency worth Rs 36,34,78,500 and arrested 9 persons in J&K terror funding case. pic.twitter.com/YILYw52t0C
— ANI (@ANI) November 7, 2017
याआधी एनआएने टेरर फंडिंग प्रकरणात कठोर पावले उचलताना हिजबूल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक केली होती. जम्मू काश्मीरचा सरकारी कर्मचारी असलेला सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा शाहिद युसूफ हा जम्मू काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ज्युनिअर इंडिनिअर आहे. 2011 टेरर फंडिंग प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. शाहिद युसूफ सौदी-अरेबियामधील हिजबूल मुजाहिद्दीनचा ऑपरेटिव्ह एजाज अहमद भटच्या संपर्कात होता हे तपासात निष्पन्न झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणा दहशतवाद्यांना नातेवाईक आणि हवालाच्या माध्यामातून मिळणा-या पैशांविरोधात सक्त कारवाई करत आहे.
काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी फुटिरतावाद्यांना पाकिस्तानकडून आर्थिक रसद पुरवली जाते हे उघड झाले होते. गेल्या आठ वर्षात दहशत माजवण्यासाठी पाकिस्तानने हुर्रियतच्या नेत्यांना तब्बल 1500 कोटी रुपये देण्यात आल्याचे हुर्रियत नेत्यांच्या घरांवर टाकण्यात आलेल्या छाप्यातून उघड झाले होते. मात्र लबाड हुर्रियत नेत्यांनी यातील अर्ध्या पैशातून काश्मीरमध्ये अशांतता माजवली तर अर्धे पैसे स्वत:ची मालमत्ता बनवण्यामध्ये गुंतवले. एनआयएने काही महिन्यांपूर्वी ही कारवाई केली होती.