दहशतवाद आणि खेळ एकत्र होऊ शकत नाही - क्रीडामंत्री

By admin | Published: May 3, 2017 07:34 PM2017-05-03T19:34:35+5:302017-05-03T19:34:35+5:30

खेळ आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही असं केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी स्पष्ट केलं

Terrorism and games can not be combined - Sports Minister | दहशतवाद आणि खेळ एकत्र होऊ शकत नाही - क्रीडामंत्री

दहशतवाद आणि खेळ एकत्र होऊ शकत नाही - क्रीडामंत्री

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - काश्मीरमध्ये पाक सैन्याने दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान खेळ आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही असं केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. 
 
जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणताही खेळ खेळला जाणार नाही असा कडक इशारा गोयल यांनी पाकिस्तानला दिला. दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून विटंबना केल्याच्या प्रकरणाला भारत सरकार गंभीरतेने घेत आहे असं ते म्हणाले. राजधानी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराच्या घोषणेवेळी ते बोलत होते.
 
यावेळी त्यांनी  पुढील आठवड्यात होणा-या आशियाई चॅम्पियनशिप कुस्तीस्पर्धेसाठी मुजोर पाकच्या खेळाडूंना व्हिसा नाकारण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.  नवी दिल्ली येथे 10 मे ते 14 मे दरम्यान आशियाई चॅम्पियनशिप होणार आहॆ. भारतात होणा-या आशियाई चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तानच्या कुस्ती संघाला व्हिसा नाकारण्यात आल्याचा दावा पाकिस्तान कुस्ती संघटनेने  केला होता. भारतीय उच्चायुक्ताने पाकिस्तानच्या संघाला व्हिसा नाकारल्याचा दावा पाकिस्तान कुस्ती संघटनेचे सचिव मोहम्मद अश्रफ यांनी केला होता. 
 
भारतात होणा-या पाच दिवसीय आशीयाई चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तानी संघाला व्हिसा नाकारण्यात आल्याचं गोयल यांनी स्पष्ट केलं.  याविरोधात आंतरराष्ट्रीय संघटनेकडे आवाज उठवणार असून भारतात होणा-या स्पर्धांवर बंदी घालावी अशी मागणी करणार असल्याचं अश्रफ म्हणाले आहेत.
 
यापुर्वी काही दिवसांपूर्वी स्क्वॉश स्पर्धेसाठीही भारताने व्हिसा नाकारला होता. शिवाय, क्रिकेटच्या मैदानातही पाकिस्तानी खेळाडूंना भारताचे दरवाजे अगोदरच बंद आहेत.     

Web Title: Terrorism and games can not be combined - Sports Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.