दहशतवाद पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा भाग - विकास स्वरुप

By admin | Published: September 22, 2016 08:37 PM2016-09-22T20:37:26+5:302016-09-22T20:37:26+5:30

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवर कडक शब्दांमध्ये टीका करत पाकिस्तनाच्या धर्तीवर दहशतवादाला खतपाणी घातलं जातं असल्याचं म्हटलं आहे

Terrorism Part of Pakistan's foreign policy - development form | दहशतवाद पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा भाग - विकास स्वरुप

दहशतवाद पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा भाग - विकास स्वरुप

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवर कडक शब्दांमध्ये टीका करत पाकिस्तनाच्या धर्तीवर दहशतवादाला खतपाणी घातलं जातं असल्याचं म्हटलं आहे. 'फक्त भारतच नाही तर जगभरातील अनेक देशांनी पाकिस्तानला दहशतवादी देश असण्याचे पुरावे दिले आहेत,' असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं आहे. 
 
'पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर आमचं लक्ष आहे. आपल्या हालचाली जगाच्या लक्षात येत आहेत ही गोष्ट त्यांना समजायला हवी,' असंही विकास स्वरुप बोलले आहेत. 
 
उरी हल्ल्याचा उल्लेख करताना भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि रशियाने या घटनेचा निषेध केल्याचं विकास स्वरुप बोलले. 'आम्ही याअगोदरही अनेक घटनांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे दिले आहेत आणि आत्तादेखील उरी हल्ल्याचे पुरावे दिले आहेत. पाकिस्तानच्या धर्तीवर दहशतवादाला वाढ दिली जाते ही गोष्ट फक्त भारत नाही तर अनेक देशांनी बोलून दाखवली असल्याचं,' विकास स्वरुप यांनी सांगितलं. 
 
विकास स्वरुप यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवत दहशतवाद हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचाच भाग झाल्याचं म्हटलं आहे. 'जगातील अनेक देशांमध्ये दहशतवाद पसरवणे त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा भाग आहे. आपल्या धर्तीवर दहशतवादाला वाढ देऊ नये असं भारताने अनेकदा पाकिस्तानला ठणकावून सांगितलं असल्याचंही,' विकास स्वरुप बोलले आहेत.  
 

Web Title: Terrorism Part of Pakistan's foreign policy - development form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.