दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक; मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 10:50 AM2021-10-12T10:50:30+5:302021-10-12T10:54:24+5:30

Pakistani Terrorist Arrested In Delhi: पाकिस्तानी दहशतवादी अली अहमद नूरी या नावाने दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये राहत होता.

Terrorist Arrested In Delhi, Pakistani terrorist along with Large quantities of ammunition arrested in delhi | दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक; मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक; मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त

Next

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या दहशतवाद्याकडून AK-47 बंदूक आणि मोठ्याप्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. पूर्व दिल्लीतील शास्त्री नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UA(P) Act, एक्सप्लोसिव्ह अॅक्ट (Explosive Act) आणि आर्म्स अॅक्ट (Arms Act) अंतर्गत या दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद अशरफ उर्फ ​​अली असे अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव आहे. हा दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी असून, तो मोहम्मद अशरफ अली अहमद नूरी या नावाने दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये राहत होता. पोलिसांनी दहशतवाद्याकडून AK-47 , काडतूस आणि ग्रेनेड जप्त केले आहेत. याशिवाय, बनावट कागदपत्रांच्या मदतीने दहशतवाद्याने बनवलेले भारताचे ओळखपत्रही पोलिसांच्या हाती लागले आहे.

दहशतवाद्याची चौकशी सुरू

दिल्ली पोलिसांना अनेक दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की एक पाकिस्तानी दहशतवादी राजधानीत लपला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्याचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा दिल्ली पोलीस सातत्याने प्रयत्न करत होते. सध्या दहशतवादी मोहम्मद अशरफ यांची चौकशी केली जात आहे. त्याच्यासोबत आणखी किती लोक आहेत हे जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. दहशतवादी मोहम्मद अशरफचे साथीदार इतर अनेक ठिकाणी लपले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. दिल्ली पोलीस इतरही अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.

Web Title: Terrorist Arrested In Delhi, Pakistani terrorist along with Large quantities of ammunition arrested in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.