श्रीनगरमध्ये BSF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तीन दहशतवाद्याचा खात्मा, जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 06:58 AM2017-10-03T06:58:33+5:302017-10-03T10:44:59+5:30

श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

A terrorist attack on a BSF camp near Srinagar airport, an attack on terrorists | श्रीनगरमध्ये BSF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तीन दहशतवाद्याचा खात्मा, जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली जबाबदारी

श्रीनगरमध्ये BSF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तीन दहशतवाद्याचा खात्मा, जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली जबाबदारी

Next

श्रीनगर - श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफ कॅम्पमध्ये घुसले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र भारतीय सुरक्षा दलाकडूनही दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरू असल्याची माहिती आहे. या  दहशतवादी हल्ल्यात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला असून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.
बीएसएफच्या 182 बटालियनवर दहशतवाद्यांनी पहाटेच्या सुमारास हा हल्ला केला आहे. एका इमारतीत आणखी तीन ते चार दहशतावादी लपल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता आहे.  सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर श्रीनगर हायवेही बंद करण्यात आला आहे. तीन ते चार दहशतवादी बीएसएफ कॅम्पमधील एका इमारतीत लपले आहेत.  श्रीनगर विमानतळावर हल्ला करण्याच्या हेतूनं दहशतवादी आले होते, मात्र भारतीय लष्कराला त्यांची माहिती मिळताच त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे दहशतवाद्यांना विमानतळात घुसता आले नाही.  हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे.












Web Title: A terrorist attack on a BSF camp near Srinagar airport, an attack on terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.