काश्मिरात दहशतवादी हल्ला, तीन पोलीस शहीद
By admin | Published: May 24, 2016 04:36 AM2016-05-24T04:36:01+5:302016-05-24T04:36:01+5:30
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे सोमवारी दहशतवाद्यांनी दिवसाढवळ्या दोन ठिकाणी हल्ले केले, ज्यात तीन पोलीस शहीद झाले. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची
श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे सोमवारी दहशतवाद्यांनी दिवसाढवळ्या दोन ठिकाणी हल्ले केले, ज्यात तीन पोलीस शहीद झाले. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून, भविष्यात असे आणखी हल्ले करण्याची धमकी दिली आहे.
पोलिसांवरील हल्ल्यांमुळे पर्यटन क्षेत्रातील मंडळींनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारांमुळे काश्मीर खोऱ्यात आणि श्रीनगरमध्ये पर्यटक येण्याचे टाळतील, अशी भीती ओमर अब्दुल्ला यांनीही व्यक्त केली. पहिला हल्ला सकाळी १०.४५ वाजता झादिबल भागातील मिल स्टॉप येथे झाला. दहशतवाद्यांनी दोन पोलिसांना अगदी जवळून गोळ्या घालून ठार केले. असिस्टंट सब इन्स्पेक्टर गुलाम मोहम्मद व हेड कॉन्स्टेबल नाजूर अहमद अशी मृतांची नावे आहेत. हल्ल्याची दुसरी घटना तेंगपुरा येथे दुपारी १२ वाजता घडली. दहशतवाद्यांनी कॉन्स्टेबल मोहम्मद सादिक यांची गोळ्या घालून हत्या केली.
हाय अलर्ट जारी
जम्मू-काश्मीर राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या ३६ तासांपूर्वी हे दोन हल्ले करण्यात आल्याने संपूर्ण खोऱ्यात हाय अलर्ट जारी केला आहे. २५ मेपासून विधानसभेचे
हे अधिवेशन सुरू होणार आहे. २०१३ नंतर पोलिसांवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या पोलिसाची सर्व्हिस रायफल लुटून नेली.