जम्मूच्या सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, गोळीबारात एक जवान जखमी; शोधकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 02:22 PM2024-09-02T14:22:48+5:302024-09-02T14:25:06+5:30

Terrorist Attack In Jammu Sunjwan military station: सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर लष्कराने परिसराला वेढा घातला आहे.

Terrorist attack on Jammu Sunjwan Army base one jawan injured in firing The search operation underway | जम्मूच्या सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, गोळीबारात एक जवान जखमी; शोधकार्य सुरू

जम्मूच्या सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, गोळीबारात एक जवान जखमी; शोधकार्य सुरू

Terrorist Attack In Jammu Sunjwan military station: सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी तळाजवळ तैनात असलेल्या एका जवानावर गोळीबार केला. या गोळीबारात जवान जखमी झाला. सकाळी ११ वाजता हा हल्ला झाला. प्रत्युत्तरादाखल लष्कराकडूनही गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यानंतर लष्कराने या परिसराला वेढा घातला असून शोधकार्य सुरु आहे.

जम्मूतील सुंजवा आर्मी बेसवर तैनात असलेल्या ३६ इन्फंट्री ब्रिगेडला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला लष्कराच्या जवानांनीही प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. दहशतवाद्यांनी तळाजवळ तैनात असलेल्या लष्कराच्या जवानावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात जवान जखमी झाला, अशी माहिती संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराने स्थानिक पोलिसांसह शोध मोहीम सुरू आहे.

याआधी गुरुवारी, लष्कराने जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मच्छल आणि तंगधर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा यशस्वीपणे खात्मा केला होता. गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि बीएसएफच्या जवानांनी दोन्ही सेक्टरमध्ये दहशतवाद्यांवर हल्ला केला आणि त्यांना ठार केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, कुपवाडा जिल्ह्यातील हे या वर्षातील सहावे ऑपरेशन आहे, ज्यामध्ये लष्कराने १० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Web Title: Terrorist attack on Jammu Sunjwan Army base one jawan injured in firing The search operation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.