पंजाबमध्ये दिवाळीत घातपाताचा प्रयत्न; काश्मीरी विद्यार्थ्यांकडून एके-47 जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 03:50 PM2018-10-10T15:50:10+5:302018-10-10T15:50:47+5:30
जालंधर : अमेरिकेप्रमाणेच भारतील विद्यापीठांमध्येही एके-47 सारख्या शस्त्रांनी प्रवेश केला असून भविष्यात मोठा धोका उद्भवणार आहे. जालंधरच्या शाहपूरमध्ये असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन विद्यार्थ्यांना एके-47 समवेत ताब्यात घेण्यात आले आहे. हे विद्यार्थी काश्मीरचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. जम्मू पोलीस आणि सीआयएफच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली.
दहशतवादाने काश्मीरमधील युवकांना पोखरले असून दिवाळीमध्ये हे विद्यार्थी पंजाबमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. हे विद्यार्थी काश्मीरी दहशतवादी संघटना अंसार गजवत-उल-हिंद या संघटनेसाठी काम करत आहेत.
या विद्यार्थ्यांच्या अटकेनंतर कॉलेजमध्ये भीतीचे वातावरण आहे. पंजाब पोलिसांनी केलेल्या खुलाशानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांकडून एके-47 सह इटालियन बनावटीची पिस्तुल, २ मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत. ही शस्रे या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातून ताब्यात घेण्यात आली आहे.