BREAKING: श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, रुग्णालयात घुसून पोलिसाची गोळ्या झाडून हत्या; चिमुकली मुलगीही गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 19:08 IST2022-05-24T18:15:49+5:302022-05-24T19:08:19+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये भ्याड हल्ला केला आहे.

BREAKING: श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, रुग्णालयात घुसून पोलिसाची गोळ्या झाडून हत्या; चिमुकली मुलगीही गंभीर जखमी
श्रीनगर-
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये भ्याड हल्ला केला आहे. यात दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या आहेत. पोलीस कर्मचारी शहीद झाला असून त्याची चिमुकली मुलगी या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Terrorist fired upon one policeman Saifullah Qadri in Soura (Anchar) area. He is critically injured. His daughter also got injured: J&K Police
— ANI (@ANI) May 24, 2022
एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी रुग्णालयात शिरुन पोलीस कर्माचऱ्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात त्यांची चिमुकली मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव सैफुल्ला कादरी असं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचं प्रमाण आता वाढलं आहे. याआधी महिन्याच्या सुरुवातीला श्रीनगरच्या अली जान रोड स्थित ऐवा ब्रिज येथे दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला लक्ष्य केलं होतं. पोलीस कर्मचारी गुलाम हसन डार यांच्यावर गोळी झाडली होती. सुदैवानं ते बचावले. पण ते गंभीर स्वरुपात जखमी झाले. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.