रात्रीच्या वेळी दहशतवादी गट शिक्षकाच्या घरात घुसला; फोन केला अन् घरातील वस्तू पळवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 21:06 IST2025-04-10T21:01:19+5:302025-04-10T21:06:59+5:30

दहशतवाद्यांनी त्यांच्या घरी जेवण केले आणि त्यांच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅप कॉल केले, नंतर कपडे, बूट, बॅग आणि छत्री हिसकावून पळ काढला.

Terrorist group enters teacher's house at night makes phone call and steals belongings | रात्रीच्या वेळी दहशतवादी गट शिक्षकाच्या घरात घुसला; फोन केला अन् घरातील वस्तू पळवल्या

रात्रीच्या वेळी दहशतवादी गट शिक्षकाच्या घरात घुसला; फोन केला अन् घरातील वस्तू पळवल्या

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर आणि किश्तवार जिल्ह्यात सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान, बुधवारी रात्री उशिरा उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड भागात तीन सशस्त्र दहशतवाद्यांचा एक गट एका ग्रामस्थाच्या घरात जबरदस्तीने घुसला. दहशतवाद्यांनी त्यांच्या घरी जेवण केले आणि त्यांच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅप कॉल केले, नंतर कपडे, बूट, बॅग आणि छत्री हिसकावून पळ काढला. हे सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
 
व्यवसायाने शिक्षक असलेले ३५ वर्षीय रशपाल सिंह म्हणाले, "बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तीन जण शस्त्रांसह आमच्या घरात घुसले. त्यांनी काळे कपडे घातले होते. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर दाढी आणि मिशा होत्या. त्यांनी आम्हाला शांत राहण्यास आणि घाबरू नका असे सांगितले." सिंह म्हणाले की त्यापैकी एक सुमारे ३४ वर्षांचा होता, तर इतर दोघे सुमारे २५ किंवा २६ वर्षांचे होते.

पोलिसांनी दोन वेळा गेलेले पैसे परत मिळवून दिले, पण कोट्यधीश होण्याच्या नादात तिसऱ्यांदा लुटला गेला...

सिंह म्हणाले, "त्यांनी भूक लागली असल्याचे सांगितले आणि जेवण अन्न मागितले. आम्ही त्यांना अन्न दिले. दहशतवादी त्यांच्या घरात घुसले तेव्हा ते त्यांच्या वृद्ध वडिलांसोबत आणि आईसोबत होते. "जेव्हा मी त्यांना विचारले की ते लष्कराचे जवान आहेत का, तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितले की ते दहशतवादी आहेत. 

सिंह म्हणाले की, तिघेही जण शस्त्रे बाळगत होते. याशिवाय, त्यापैकी दोघांकडे सामान्य दिसणारी शस्त्रे देखील होती, जी कदाचित AK-47 होती. 

"त्यांनी माझ्या फोनवरून कोणालातरी व्हॉट्सअॅप कॉल केला आणि त्याच्याशी बोलले पण त्याची भाषा आम्हाला समजत नाही. ते एकमेकांशी उर्दूमध्ये बोलत होते,असंही रशपाल सिंह यांनी सांगितले. घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी माझा मोबाईल फोन, काही कपडे, पँट, बूट, छत्री आणि बॅग हिसकावून घेतला. 

Web Title: Terrorist group enters teacher's house at night makes phone call and steals belongings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.