पॅराशूटद्वारे दहशतवादी करु शकतात हल्ला, IB कडून अलर्ट

By admin | Published: October 5, 2016 03:06 PM2016-10-05T15:06:03+5:302016-10-05T15:06:03+5:30

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी भारतामध्ये दहशतवादी हल्ले होण्याती शक्यता आहे

Terrorists can attack through parachute, alert from IB | पॅराशूटद्वारे दहशतवादी करु शकतात हल्ला, IB कडून अलर्ट

पॅराशूटद्वारे दहशतवादी करु शकतात हल्ला, IB कडून अलर्ट

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी भारतामध्ये दहशतवादी हल्ले होण्याती शक्यता आहे. भारतात अशांती पसरवण्यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करण्याची शंका आहे. दहशतवादी पॅराशूट अथवा पॅराग्लायडिंगचा वापर करत घुसखोरी करुन आत्मघाती हल्ले करण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेने तसा अलर्टही दिला आहे. गुजरातमधील एका वरिष्ठ अधिका-याने गुप्तचर यंत्रणेने अलर्ट दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अलर्टनंतर सीमारेषेवरील भागांमध्ये पॅराशूटसारख्या हवेत उडणा-या गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टमध्ये लष्कर-ए-तयब्बाचाही उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर लष्कर-ए-तयब्बाचा म्होरक्या हाफिज सईदच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे. सीमारेषेवरील पोलिसांना लष्कर आणि बीएसएफ जवानांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
 
सुरक्षा यंत्रणा मुख्यत: जास्त काळजी घेत आहेत कारण गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून फायरिंग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा दहशतवाद्यांनी घुसखोरी करता यावी यासाठी फायरिंग केली जाते.
 
आर्थिक आणि तांत्रिक बाबतीत लष्कर-ए-तयब्बा मजबूत असल्याचं सुत्रांकडून कळलं आहे. भारतावर हल्ला कऱण्यासाठी ते काहीही करु शकतात. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर हाफिज सईददेखील भडकला असून भारताला सर्जिकल स्ट्राईक काय असतं हे दाखवून देऊ अशी धमकीही दिली होती. 
 

Web Title: Terrorists can attack through parachute, alert from IB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.