जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; तीन दिवसांत चौथ्यांदा चकमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 10:06 PM2024-06-12T22:06:00+5:302024-06-12T22:12:30+5:30
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात आज पुन्हा चकमक सुरू झाली. केंद्रशासित प्रदेशात गेल्या तीन दिवसांतील ही चौथी चकमक आहे.
जम्मू-काश्मीर मधील डोडा जिल्ह्यात आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसांतील जम्मू-काश्मीरमधील ही चौथी चकमकीची घटना आहे. कालपासून डोडा भागात झालेली ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला होता. ९ जून रोजी रियासी येथे दहशतवाद्यांनी यात्रेकरूंवर हल्ला केला होता, यात नऊ जण ठार झाले होते. याशिवाय कठुआ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
'खेला होबे'! भाजपाचे ३ खासदार TMC च्या संपर्कात असल्याचा दावा; संख्या २३७ होणार?
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील सीमावर्ती गावात लपून बसलेल्या एका दहशतवाद्याला बुधवारी सुरक्षा दलांनी १५ तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या ऑपरेशनमध्ये ठार केले. यादरम्यान आणखी एक दहशतवादीही मारला गेला. मात्र, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदा सुखल गावात दोन दहशतवादी दिसल्यानंतर मंगळवारी रात्री सुरू झालेल्या कारवाईदरम्यान दोन वरिष्ठ अधिकारी सुरक्षितपणे बचावले. मात्र, त्यांच्या वाहनांना गोळ्या लागल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी डोडा जिल्ह्यातील भदेरवाह-पठाणकोट मार्गावरील चत्रगालाच्या वरच्या भागात एका संयुक्त चेक पोस्टवर हल्ला केला, यात राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान आणि एक विशेष पोलिस अधिकारी जखमी झाले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरू असलेल्या कारवाईमुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवानही शहीद झाला.
पोलिसांनी २० लाख बक्षीस जाहीर केले
रविवारी रियासी येथील शिव खोडी मंदिरापासून कटरा येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था कडक करताना या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या हल्ल्यात बस रस्त्यावरून खोल दरीत कोसळली, त्यात नऊ जण ठार तर ४१ जखमी झाले. बस हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या ठावठिकाणाबाबत माहिती देणाऱ्याला पोलिसांनी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून एका दहशतवाद्याचे 'स्केच'ही प्रसिद्ध केले आहे.
An Encounter has started in the Gandoh area of Doda. More details awaited: J&K Police
— ANI (@ANI) June 12, 2024