जम्मू-श्रीनगर महामार्गावर चकमक, लष्कराकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, तीन जाणांना घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 08:47 AM2020-01-31T08:47:39+5:302020-01-31T09:25:04+5:30
बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवल्यानंतर आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर महामार्गावर नगरोटा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत 1 दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले असून, तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. चकमक अद्याप सुरू आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवल्यानंतर आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आहे.
J&K Police: Police intercepted a Srinagar bound truck at Bann toll plaza on Jammu-Srinagar highway. Truck bound terrorists fired on police triggering an encounter. One policeman injured, one terrorist killed. (deferred visuals) pic.twitter.com/TYVDWACGi8
— ANI (@ANI) January 31, 2020
दरम्यान, ही चकमक उडाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराचा ताबा घेत शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच मार्गावरील वाहनांची कसून तपासणी सुरू आहे.
Jammu-Srinagar National Highway closed after firing in the area. More details awaited. #JammuAndKashmir (deferred visuals) pic.twitter.com/bUrdJoPuv9
— ANI (@ANI) January 31, 2020
जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जम्मू -श्रीनगर महामार्गावरील बान टोल प्लाझा येथे एका ट्रकला अडवल्यानंतर त्या ट्रकमधील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर चकमकीस सुरुवात झाली. दरम्यान, बान टोल प्लाझा जवळ दोन स्पोट झाल्याचा आवाजही ऐकण्यास आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार टोल प्लाझाजवळ सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना गुंगारा देण्यासाठी दहशतवाद्याने लष्करी गणवेशासारखी वेशभूषा केली होती.
#UPDATE Two explosions heard near Bann toll plaza on Jammu-Srinagar highway where the encounter between terrorists and security forces is underway. One policeman injured, one terrorist killed in the encounter (deferred visuals) pic.twitter.com/I7fwofQphL
— ANI (@ANI) January 31, 2020