पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 05:33 PM2020-05-21T17:33:50+5:302020-05-21T17:49:44+5:30
सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसाच्या एकत्रित टीमवर अचानक दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला.
श्रीनगर: जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या एका तुकडीवर आज (गुरुवार) दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. यानंतर जवानांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. या घटनेत जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या हल्ल्यात एक जवान जखमी झाले आहे.
सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसाच्या एकत्रित टीमवर अचानक दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. यात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन जवान जखमी झाले. यातील एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अजूनही सुरु असून सीआरपीएफने दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवली असल्याचे माहिती सांगण्यात येत आहे.
Terrorists attacked a joint team of police and CRPF in Pulwama of Jammu and Kashmir. Two jawans injured in the attack, area has been cordoned off and search is on: CRPF sources
— ANI (@ANI) May 21, 2020
Terrorists fired upon a joint naka party of police and CRPF at Prichoo, Pulwama. 2 police personnel got injured in the incident, however, one of the injured succumbed to his injuries and attained martyrdom. Further details shall follow: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) May 21, 2020