इसिसच्या 'या' दहशतवाद्याने देशात रक्तपाताचा रचला होता कट

By admin | Published: October 8, 2016 09:22 AM2016-10-08T09:22:54+5:302016-10-08T09:40:42+5:30

इसिसचा अटक केलेला संशयित दहशतवादी सुब्हानी हजा मोईद्दीनने देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली होती, अशी माहिती समोर येत आहे.

The 'terrorists of Isis' had set up bloodshed in the country | इसिसच्या 'या' दहशतवाद्याने देशात रक्तपाताचा रचला होता कट

इसिसच्या 'या' दहशतवाद्याने देशात रक्तपाताचा रचला होता कट

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8 - इसिसचा अटक केलेला संशयित दहशतवादी सुब्हानी हजा मोईद्दीनने देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली होती, अशी माहिती समोर येत आहे. मात्र सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या वेळीच मुसक्या आवळल्या आहेत. याआधी तो श्रीनगर आणि कोलकातामध्येही हल्ला घडवून आणण्याच्या प्रयत्नात होता. संशयित कारवायांमुळे एनआयएने त्याला तामिळनाडूतून ताब्यात घेतले. सुब्हानीला इसिसकडून तीन महिन्यांचे ट्रेनिंग मिळाले आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनुसार, सप्टेंबरमध्ये भारतात परतल्यानंतर मोईद्दीन इसिसच्या संपर्कात होता. कशा प्रकारचा हल्ला घडवून आणायचा आहे, यासंदर्भातील चर्चा तो इंटरनेटद्वारे  इसिससोबत करत होता. 
 
तसेच इसिसच्या देशभरातील घडामोडींवर मोईद्दीन नजर ठेऊन होता. हल्ले कसे करायचे, याची मोडस ऑपरेंडी तो हल्लेखोरांना सांगायचा. त्याच्या या कारवाया काही महिन्यांपूर्वी समोर आल्यामुळे तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. इसिसकडून त्याला सर्व प्रकारचे ट्रेनिंग मिळाले आहे, त्यामुळे तो देशासाठी धोकादायक ठरू शकला असता,अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. नुकतच त्याने केरळमधील इसिससंबंधित लोकांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मोईद्दीनला कॅम्प्युटरबाबत जास्त माहिती आहे, आणि त्याने आपल्या हल्ल्याची योजना आणखण्यासाठी याचा पुरेपुर वापर देखील केला होता.
 
दरम्यान, मोईद्दीनचे इसिस प्रभावित क्षेत्रातून भारतात परतणे हे चांगले संकेत असल्याचे मानले जात आहे. तेथील हिंसा आणि रक्तपात सहन करू न शकल्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचे मोईद्दीनने सांगितले . गुडघ्याला गंभीर दुखापत झालेली असतानाही 40 दिवस जेलमध्ये ठेवल्याचा दावाही त्याने केला आहे.  याआधी अरीब माजीद नावाचा तरुण इसिसच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रातून भारतात परतला होता. इसिसकडून भारतीयांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते, असा दावा अरीबने केला होता. 
 

Web Title: The 'terrorists of Isis' had set up bloodshed in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.