अतिरेक्यांची कराची, युरोपचा अहवाल : भारतविरोधी संघटनांचे केंद्र

By admin | Published: February 18, 2017 04:51 AM2017-02-18T04:51:33+5:302017-02-18T04:51:33+5:30

पाकिस्तान पंथ व राजकीय ताणतणावांनी ग्रस्त असून, कराची हे भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे केंद्र बनले आहे, असे युरोपमधील

Terrorists report Karachi, Europe: Center for anti-India organizations | अतिरेक्यांची कराची, युरोपचा अहवाल : भारतविरोधी संघटनांचे केंद्र

अतिरेक्यांची कराची, युरोपचा अहवाल : भारतविरोधी संघटनांचे केंद्र

Next

लंडन : पाकिस्तान पंथ व राजकीय ताणतणावांनी ग्रस्त असून, कराची हे भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे केंद्र बनले आहे, असे युरोपमधील गटाने म्हटले आहे.
इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने (आयसीजी) पाकिस्तानवरील अहवालात म्हटले की, लष्कर-ए-तय्यबा, जमात-उद-दावा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या भारत विरोधी संघटनांना मदरसे व धार्मिक संस्था चालवण्यासाठी सुरक्षा दले मदत करतात. पाकिस्तानमधील सर्वांत धोकादायक गट कराची येथून विविध कारवायांत सक्रिय भाग घेत आहेत. शियाविरोधी लष्कर-ए-झांगवी व भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे
जवळचे संबंध आहेत. ब्रुसेल्स येथील या विचारगटाने म्हटले की, दशकानुदशकांचे दुर्लक्ष आणि ढिसाळ कायदा-सुव्यवस्था यामुळे कराचीचे रूपांतर प्रेशर कुकरमध्ये झाले आहे. जेव्हा जेव्हा भारत-पाकसंबंधांत किंवा काश्मिरात तणाव असतो तेव्हा तेव्हा हे गट शहरातील मध्यवर्ती भागांत सुरक्षित असतात. लष्कर किंवा जैश यासारख्या संघटना देशाच्या एका भागात मित्र आणि दुसऱ्या भागात शत्रूचे काम करतात, असे तर पाकचे सरकार म्हणू शकत नाही ना. सरकारचा छुपा पाठिंबा व कमालीची अनागोंदीची स्थिती, यामुळे जिहादी गटांचे चांगलेच फावले, असेही अहवालात म्हटले आहे.
सूत्रांचा हवाला देत आयसीजीने म्हटले की, अनेक जिहादींचे सूत्रधार सप्टेंबर २०१३ मध्ये सैनिकी कारवाईच्या भीतीतून कराचीला पळून आले. मात्र, आता कारवाई होत नसल्याने कराचीतच स्थायिक झाले असावेत. आयसीजीने पाकच्या सेवानिवृत्त वरिष्ठ प्रांतीय अधिकाऱ्याचा हवाला  देऊन म्हटले की, पाक-भारत किंवा काश्मीरवरून तणाव वाढतो तेव्हा हे  गट शहराच्या मुख्य भागात सक्रिय  होतात. (वृत्तसंस्था)
 
बेरोजगारीमुळे संघटनांचे फावते...
कराचीतील पोलिस अधिकाऱ्याचा हवाला देऊन आयसीजीने म्हटले की, आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वेगळा असल्याचे बघण्याची सवय लागली आहे. आम्ही तसे करू शकत नाही. आम्ही त्या प्रश्नाकडे आमच्या परराष्ट्र धोरणातूनही बघायला हवे. या अहवालात असेही म्हटले आहे की जिहादींच्या बाजूने असलेले महत्वाचे मदरसे त्यांना हवे तसे वागत आहेत. बेरोजगारीमुळे वेगळे पडलेले युवक वा तरूण जिहादींच बनतात, असे समजणे योग्य नाही.

उत्पन्नाचे साधन नसणाऱ्यांना ओढतात जाळ्यात
चांगला पैसा मिळत असलेल्या कराचीतील जिहादी संघटनांबद्दल अहवालात माहिती आहे. जगण्याचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसलेल्यांना करातीचील जिहादी संघटना खास पुढाकार घेऊन आपल्यात ओढतात. त्यापैकी अनेकांना इतर पर्याय फारच थोडे उपलब्ध असतात त्यांना जिहाद हे काम मिळते, असे आयसीजीने म्हटले.

Web Title: Terrorists report Karachi, Europe: Center for anti-India organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.