शोपियानमध्ये बिहारी मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या; तीन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 23:29 IST2023-07-13T23:28:37+5:302023-07-13T23:29:02+5:30
अचानक झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी या घटनेची माहिती सुरक्षा दलाला दिली.

शोपियानमध्ये बिहारी मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या; तीन गंभीर
दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला आहे. शोपियानमध्ये मजुरी करणाऱ्या बिहारच्या तीन तरुणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. तिघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर अमरनाथ यात्रेची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे.
बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पमध्ये चौकाचौकात नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
शोपियानमध्ये गुरुवारी रात्री ९ वाजता हा हल्ला झाला आहे. मुखवटा घातलेले दहशतवादी एसओजी कॅम्पजवळ राहणाऱ्या इर्शाद हुसैन यांच्या घरामध्ये घुसले. तेथे भाड्याने राहणाऱ्या परप्रांतीय तरुणांची त्यांनी चौकशी केली. यानंतर तिघांच्या खोलीत घुसून गोळ्या झाडल्या.
अचानक झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी या घटनेची माहिती सुरक्षा दलाला दिली. तिघेही गंभीर जखमी आहेत. त्यांची प्रकृती पाहता त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले आहे.