‘पृथ्वी-२’ची चाचणी
By admin | Published: February 17, 2016 02:55 AM2016-02-17T02:55:37+5:302016-02-17T02:55:37+5:30
स्वदेशनिर्मित पृथ्वी- २ क्षेपणास्त्राची चाचणी मंगळवारी यशस्वीरीत्या पार पडली. लष्कराच्यावतीने चांदीपूर येथे ही चाचणी पार पाडण्यात आल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बालासोर (ओडिशा) : स्वदेशनिर्मित पृथ्वी- २ क्षेपणास्त्राची चाचणी मंगळवारी यशस्वीरीत्या पार पडली. लष्कराच्यावतीने चांदीपूर येथे ही चाचणी पार पाडण्यात आल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या तसेच ३५० कि.मी. वरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची ५०० ते १००० किलो मुखास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे.
सकाळी १० वाजता चांदीपूरच्या एकात्म चाचणी क्षेत्रातील (आयटीआर)संकुल ३ मधील मोबाईल लाँचरवरून या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या क्षेपणास्त्राला दुहेरी इंजिन असून ते द्रवरूप इंधनावर चालते. त्याला अत्याधुनिक एकात्म मार्गदर्शक यंत्रणा जोडलेली असून ते शिताफीने क्षेपणास्त्र पथ बदलवत लक्ष्याचा वेध घेऊ शकते. लष्कराने खास स्थापन केलेल्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ)शास्त्रज्ञांच्या निगराणीत पार पाडलेल्या चाचणीच्या डाट्याचे विश्लेषण केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. (वृत्तसंस्था)