इस्त्रोकडून स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी यशस्वी

By admin | Published: August 28, 2016 09:11 AM2016-08-28T09:11:41+5:302016-08-28T09:13:42+5:30

इस्त्रोने रविवारी पहाटे आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावर स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली.

Testing of Scramjet Engine from Istrok is successful | इस्त्रोकडून स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी यशस्वी

इस्त्रोकडून स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी यशस्वी

Next

ऑनलाइन लोकमत 

श्रीहरीकोटा, दि. २८ -  भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने रविवारी पहाटे आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावर स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली. स्क्रॅमजेट इंजिन वातावरणातील ऑक्सिजनच्या मदतीने इंजिनातील इंधन प्रज्वलित करते. 
 
पूर्नवापरायोग्य आरएलव्ही यानामध्ये स्क्रॅमजेट इंजिन उपयोगात आणता येईल असे वैज्ञानिकांनी सांगितले. सकाळी सहाच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली. यानाच्या पारंपारीक इंजिनामध्ये इंधन आणि ऑक्सिडायजर दोन्ही असते. 
 
इथे स्क्रॅमजेट इंजिनमध्ये वातावरणातील ऑक्सिजन यानातील इंधन प्रज्वलित करण्यासाठी  ऑक्सिडायजरचे काम करणार आहे. सकाळी सहा वाजता ही चाचणी घेण्यात आली. स्क्रॅमजेटमुळे प्रक्षेपण खर्च आणखी कमी होणार आहे. आता आरएलव्ही यानामध्ये स्क्रॅमजेट इंजिनाची चाचणी घेण्यात येणार आहे. 
 

Web Title: Testing of Scramjet Engine from Istrok is successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.