नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ठाकरे, तर उपाध्यक्षपदी अहुजा

By Admin | Published: July 13, 2017 05:30 PM2017-07-13T17:30:48+5:302017-07-13T23:52:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क

Thakre, president of Nashik Bar Association, and Ahuja, vice president | नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ठाकरे, तर उपाध्यक्षपदी अहुजा

नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ठाकरे, तर उपाध्यक्षपदी अहुजा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा न्यायालयातील नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत कार्यकारिणीतील अकरापैकी पाच पदांची बुधवारी (दि़ १२) मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले़ त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष ॲड़ नितीन बाबूूराव ठाकरे यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी मिळाली असून,उपाध्यक्षपदी ॲड. प्रकाश आहुजा, सचिवपदी ॲड़ जालिंदर ताडगे, सहसचिवपदी ॲड़ श्यामला दीक्षित, तर सहसचिव ॲड़ शरद गायधनी हे निवडून आले़ दरम्यान, उर्वरित सहा पदांची मतमोजणी गुरुवारी (दि़ १३) सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे़
नाशिक बार असोसिएशनच्या कार्यकारिणीसाठी मंगळवारी (दि. ११) ८३़५६ टक्के मतदान झाले होते़ त्यामध्ये तीन हजार ४३ पैकी दोन हजार ५४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता़ असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व महिला सहसचिव या पाच पदांच्या मतमोजणीस बुधवारी न्यायालयातील आयटी लायब्ररीत सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात झाली होती़ सर्वप्रथम अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करण्यात आला़ त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष ॲड. ठाकरे यांनी ॲड़ महेश आहेर यांच्यावर २१८ मतांनी पराभव केला़
उपाध्यक्षपदी ॲड़ प्रकाश अहुजा यांनी ॲड़ सुदाम पिंगळे यांचा ४५६ मतांनी, सचिवपदासाठी ॲड़ जालिंदर ताडगे यांनी ॲड. वैभव शेटे यांचा ८० मतांनी, सहसचिव पदासाठी ॲड. शरद गायधनी यांनी ॲड़ हेमंत गायकवाड यांचा १३७, तर सहसचिव (महिला) या पदासाठी ॲड़ श्यामला दीक्षित यांनी ॲड़ मंगला शेजवळ यांचा २४० मतांनी पराभव केला़ अध्यक्ष, सचिव व सहसचिव या पदासाठी फेरीनिहाय कमी-अधिक होणार्‍या मतांमुळे उमेदवारांची चलबिचल होत होती़ निकाल जाहीर होताच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला होता़

--इन्फो--
विजयी उमेदवारांनी मिळालेली मते
--------------------------------------------------
पद उमेदवाराचे नाव मिळालेली मते
--------------------------------------------------
अध्यक्षॲड. नितीन ठाकरे १०३७
ॲड. महेश अहेर ८१९
उपाध्यक्ष ॲड. प्रकाश अहुजा ११४५
ॲड. सुदाम पिंगळे ६८९
सचिव ॲड. जालिंदर ताडगे८९८
ॲड. वैभव शेटे ८१८
सहसचिवॲड. शरद गायधनी ११७६
ॲड. हेमंत गायकवाड१०३९
सहसचिव (महिला) ॲड. श्यामला दीक्षित९०४
ॲड. मंगला शेजवळ ६६४
--------------------------------------------------

--कोट--
नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदावर असताना केलेल्या कामाची पावतीच वकिलांनी दिली आहे़ या संधीचे सोने करणार असून, पोलीस आयुक्तालयाकडून मिळालेल्या जागेवर मुख्यमंत्र्याना भेटून नवीन इमारतीचे काम, निधीची तरतूद यासाठी प्रथम प्राधान्य असणार आहे़ याबरोबरच वकिलांना काम करताना भेडसावणारे प्रश्न तसेच वकील भवनसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत़
- ॲड़ नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार असोसिएशन, नाशिक़

फोटो :- १२ पीएचजेएल ७१
नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड़ नितीन ठाकरे हे निवडून आल्यानंतर जल्लोष करताना वकीलवर्ग व त्यांचे समर्थक़

फोटो :-
१) आर / फोटो / १२ ॲड़ प्रकाश अहुजा
२) आर / फोटो / १२ ॲड़ जालिंदर ताडगे
३) आर / फोटो / १२ ॲड़ शरद गायधनी
४) आर / फोटो / १२ ॲड़ श्यामला दीक्षित या नावाने सेव्ह केले आहेत़

Web Title: Thakre, president of Nashik Bar Association, and Ahuja, vice president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.