Breaking: पंतप्रधान मोदींचा पुन्हा 'धक्का'; लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 10:27 AM2019-06-18T10:27:39+5:302019-06-18T11:22:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळीही नेहमीप्रमाणेच एकदम चर्चेत नसलेला चेहरा समोर आणला आहे.
नवी दिल्ली - 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून राजस्थानमधीलखासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ओम बिर्ला यांच्या पत्नी अमिता बिर्ला यांनी याबद्दल संसदीय कॅबिनेटचे आभारही मानले आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना, ओम बिर्ला यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल आम्ही मंत्रिमंडळाचे मनापासून धन्यवाद मानतो, असे अमिता यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळीही नेहमीप्रमाणेच एकदम चर्चेत नसलेला चेहरा समोर आणला आहे. कोटा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार बनलेल्या ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदाचा बहुमान देण्यात आल्याची माहिती आहे. आज दुपारी बिर्ला अधिकृतपणे लोकसभा अध्यक्षपदाची औपचारिकता पूर्ण करणार आहे. नुकतेच, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भेटीसाठी बिर्ला हे त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत. मात्र, बिर्ला यांच्या पत्नी अमिता यांनी ओम बिर्ला यांच्या निवडीबद्दल अभिमान आणि अत्यानंद असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच, त्याबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभारही मानले आहेत. दरम्यान, खासदार बनण्यापूर्वी बिर्ला हे तीनवेळी दक्षिण कोटा मतदारसंघातून आमदार बनले होते. तर, पर्यावरणप्रेमी नेता अशी बिर्ला यांची ओळख आहे.
Amita Birla, wife of BJP MP Om Birla, who reportedly is the NDA candidate for the post of Lok Sabha Speaker: It is a very proud and a happy moment for us. We are very thankful to the cabinet for choosing him. (In pic 2&3 : BJP MP Om Birla) pic.twitter.com/lPYB2jQEQn
— ANI (@ANI) June 18, 2019
कोण आहेत नवनियुक्त लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला? #OmBirlahttps://t.co/NHIkUyhoJf
— Lokmat (@MiLOKMAT) June 18, 2019